शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

इंद्राणीने शीनाची चुकीची जन्मतारीख का नोंदविली?

By admin | Updated: September 2, 2015 02:38 IST

शीना हत्याकांड प्रकरणात नवे खुलासे होत असताना आज इंद्राणीचे पती आणि शीनाचे वडील सिद्धार्थ दास प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली

डिप्पी वांकाणी , मुंबई शीना हत्याकांड प्रकरणात नवे खुलासे होत असताना आज इंद्राणीचे पती आणि शीनाचे वडील सिद्धार्थ दास प्रथमच समोर आले आहेत. दरम्यान, इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली याबाबत आता पोलीस तपास करीत आहेत.इंद्राणीने २००२मध्ये शीनाचे जन्म प्रमाणपत्र तयार केले होते. त्यानुसार शीनाची जन्मतारीख १९८९मधील दाखविण्यात आली आहे; पण शीनाचा जन्म ११ फेब्रुवारी १९८७चा असल्याचा दावा सिद्धार्थ दास यांनी केला आहे. इंद्राणीने शीनाची जन्मतारीख चुकीची का नोंदविली यावर आता तर्कवितर्क केले जात आहेत. पीटर व इंद्राणी हे जोडपे वर्षभरात एकदा किंवा दोनदा भारतात येत असे. ते जास्तीतजास्त लंडनमध्येच असायचे. मुंबईतील त्यांचे घरही त्यामुळे बहुधा बंदच असायचे, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी ही शीनाचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट वापरत होती. यातून काही माहिती मिळते का याचा पोलीस तपास करीत असून, कदाचित तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आता सिद्धार्थ दास यांच्याकडून महत्त्वाची माहिती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलिसांना आता सिद्धार्थ दास यांचे डीएनए नमुने हवे असून, त्या माध्यमातून शीना आणि सिद्धार्थ यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करता येईल. दरम्यान, शीना आणि मिखाईलला मारल्यानंतर त्यांचे मृतदेह नेण्यासाठी ज्या दोन सुटकेस खरेदी करण्यात आल्या होत्या, त्या सुटकेसचा आकार शीना व मिखाईलच्या शरीररचनेशी मिळताजुळता आहे, हे विशेष. ...तर इंद्राणीला फाशी द्याशीना हत्याकांडानंतर प्रथमच समोर आलेले तिचे वडील सिद्धार्थ दास म्हणाले की, जर इंद्राणीने ही हत्या केली असेल तर तिला फाशी द्या. आपण इंद्राणीसोबत लग्न केले नव्हते, तर आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा खुलासाही दास यांनी केला आहे. शीना व मिखाईल ही माझीच मुले असून इंद्राणी या मुलांची आई आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शीना दहावीत असताना आपण तिच्याशी शेवटचे बोललो होतो. तर, मिखाईलशी काहीच संपर्क नव्हता. कोलकात्यात आपण लग्नानंतर स्थायिक झालो होतो आणि या भूतकाळात वळून पाहण्याची माझी इच्छाही नव्हती. पोलिसांना हवे ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही दास म्हणाले.