शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 07:47 IST

स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी विरोधातील लढा यांसह प्रत्येक अन्यायाविरोधात लोकांच्या हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला.

मधु मोहिते(सरचिटणीस, युसुफ मेहेरअली सेंटर)लोकमत न्यूज नेटवर्क

स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी विरोधातील लढा यांसह प्रत्येक अन्यायाविरोधात लोकांच्या हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. अखेरपर्यंत त्यांनी सत्याग्रह आणि आंदोलनाची मशाल तेवत ठेवली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने आणि त्यावरील खड्ड्यांविरोधात झालेल्या आंदोलनात वयाच्या ८८व्या वर्षी २०१२-२०१३ मध्ये डॉ. पारीख महामार्गावर खुर्ची टाकून बसले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि सेझ प्रकल्पाविरोधातील मोर्चातही ते सहभागी झाले होते. मुंबईत झालेले सीएए-एनआरसी विरोधातील तरुण पिढीचे आंदोलन असो अथवा अन्य आंदोलने असोत, डॉ. पारीख सक्रिय होते. प्रस्थापितांना जाब विचारणाऱ्या आंदोलनांना ते कायम पाठिंबा देत किंबहुना त्यात सामीलही होत असत. 

उमाकांत पुतली या उद्योजक सहकाऱ्याने पनवेल तालुक्यातील तारा गावात डॉ. पारीख  यांना नेले. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात आरोग्य सेवा किती विदारक स्थितीत आहे, लोकांना साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांवर उपचार मिळत नाहीत, याचे वास्तव डॉ. पारीख  यांना दाखविले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवेतील सहकाऱ्यांना आणि सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तारा येथे ‘संडे क्लिनिक’ संकल्पना सुरू केली. गावकऱ्यांनी गवताने साकारलेल्या मांडवाखाली डॉ. पारीख रुग्णांना तपासत असत. त्यांच्या संडे क्लिनिकमध्ये एका वेळी ३००-४०० रुग्णांना ते तपासत असत. हा उपक्रम १९६२ रोजी सुरू झाला. आता त्याचा वटवृक्ष झाला आहे.

तारा येथे सुरू केलेल्या युसुफ मेहेरअली सेंटरचा या ६३ वर्षांत विस्तार तेल घाणी, साबण बनविणे, मातीची भांडी आणि खेळणी बनविणे, सुतारकाम, डेअरी आणि गांडूळ खत प्रकल्प, हर्बल नर्सरी, सेवाग्राम प्रती बापू कुटी, बा कुटी येथपर्यंत पोहचला. ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराची संधी मिळावी म्हणून त्यांनी हे ग्रामोद्योग उभे केले. तसेच तीन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शंभर-सव्वाशे मुलींचे वसतिगृह उभारले. दुसरे रुग्णालय रत्नागिरीतील गुहागर येथील अंजनवेल येथे सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या युसुफ मेहेरअली सेंटरचे काम आता देशभरातील १२ ते १३ राज्यांत विस्तारले आहे. त्याच धर्तीवर जम्मू-काश्मीरपासून ते ओडिशा आणि आसामपर्यंत ही केंद्रे सुरू झाली आहेत. तेथील स्थानिकांना ही केंद्रे रोजगार देत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. G. G. Parikh's Goa Highway Protest: A Chair of Resistance

Web Summary : Veteran freedom fighter Dr. G.G. Parikh, at 88, protested highway potholes by sitting on a chair. He championed various causes, from Goa's liberation to opposing nuclear projects. His Yusuf Meherally Centre provides healthcare and employment, impacting rural lives across India.
टॅग्स :Deathमृत्यू