सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

By Admin | Updated: June 20, 2014 02:24 IST2014-06-20T02:24:31+5:302014-06-20T02:24:31+5:30

राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत.

What is the need for irrigation inquiries? | सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

>अजित पवार यांचा विरोधकांना सवाल : चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली, सीबीआय चौकशीला आक्षेप
मुंबई : विरोधकांनी मागणी केल्यानुसार राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आता थेट जनतेत जाऊन उत्तर देऊ, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर पवार यांच्यावर या अहवालात दोषारोप असल्याचा दावा करीत भाजपाने त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले,  जलसंपदा विभागात गैरव्यवहारांची ओरड झाली म्हणून आम्ही आधी श्वेतपत्रिका काढली. मी राजीनामा पण दिला होता. आम्ही चितळे समिती नेमून चौकशी केली. या समितीची मागणी विरोधकांनीच केली होती. राज्यात सिंचनाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले, असे समितीने स्पष्ट केले आहे. क्.1 टक्केच सिंचन 1क् वर्षात वाढल्याचा दावा पूर्णत: फेटाळून लावला आहे. अहवालात मला क्लीन चिट दिलेली आहे. समितीच्या 22पैकी 2क् शिफारशी शासनाने स्वीकारल्या. तरीही विरोधक राजकारण करीत आहेत. त्यातही माङयावर काही दोषारोप नाहीत. तरीही आता पुन्हा नव्याने आरोप केले जात आहेत. सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरवेळी मलाच लक्ष्य केले जाते. इतके दिवस मी शांत होतो पण आता मी जनतेत जाऊन बोलणार आहे, या शब्दांत पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले. 
प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्षपदाबाबतचे मनोगत आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडले आहे. ते निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष बदलणार या बातम्या मी पेपरमध्येच वाचतोय. (विशेष प्रतिनिधी)
 
भाजपाला आता हवीय सीबीआय चौकशी
राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणा:या चितळे समितीचा अहवाल ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप प्रदेश भाजपाने केला आहे. सिंचन घोटाळ्यांची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, या मागणीसाठी भाजपा आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: What is the need for irrigation inquiries?