शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:21 IST

Kerosene Rate Pune Today Marathi: एलपीजी टंचाईमुळे नागरिकांची स्टोव्ह दुरुस्तीसाठी गर्दी. रेशनवर पुन्हा रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, राज्यात आता 'रॉकेल' (केरोसिन) युगाचे पुनरागमन झाले आहे. गॅस संपण्याच्या भीतीमुळे आणि नवीन सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने, लोकांनी अडगळीत पडलेले स्टोव्ह बाहेर काढले आहेत. यामुळे बाजारात रॉकेलच्या मागणीत वाढ झाली असून दरांमध्येही मोठी तफावत दिसून येत आहे.

रॉकेलचे ताजे दर 
सध्या पुण्यातील बाजारपेठेत रॉकेल खालील दराने मिळत आहे:

रेशन दुकान : ₹६० प्रति लिटर.

काळा बाजार : ₹१०० ते ₹१२० प्रति लिटर.

रेशनिंगवर रॉकेल पुन्हा उपलब्ध
गेल्या काही वर्षांत रेशनवरील रॉकेल बंद करण्यात आले होते. मात्र, सध्याची आणीबाणीची परिस्थिती आणि एलपीजी शॉर्टेज पाहता, सरकारने पुन्हा एकदा रेशन दुकानांवर रॉकेलचा पुरवठा सुरू केला आहे. प्रामुख्याने ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही किंवा ज्यांचे सिलिंडर वेळेवर येत नाहीत, अशा लोकांसाठी हा मोठा आधार ठरत आहे.

'पॅनिक बाइंग' आणि काळा बाजार
लोकांमध्ये सध्या पॅनिक बाइंग सुरु झाले आहे. इराण युद्द सुरु झाल्यानंतर एलपीजीसाठी नंबर लावण्यास सुरुवात झाली होती. ती संपत नाही तोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत कोरोना लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवू शकते, असे सांगितल्याने लोकांनी पेट्रोल, डिझेलसाठी देखील रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यात कंपन्यांनी इंधनाचे दर वाढतील म्हणून पेट्रोल पंपांनाच पुरवठा कमी केला. याचा परिणाम अफवा आणि पॅनिक बाइंग वाढण्यावर झाला. 

महाराष्ट्राचे केरोसीन (रॉकेल) वाटप
१) एकूण वाटप
केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास ३,७४४ KL (३७,४४,००० लिटर) रॉकेल वाटप केले आहे.
२)  प्रति लाभार्थी
प्रति कुटुंब/प्रति शिधापत्रिका ३ (तीन) लिटर रॉकेल अनुज्ञेय राहील.

कुणाला मिळणार रॉकेल?
◼️ AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना रॉकेल वितरणास प्राधान्य देण्यात येईल.
◼️ रॉकेल विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करुन रॉकेल उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील रॉकेल मिळण्यास पात्र असतील.
◼️ ज्या कुटंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात यावा.)
◼️ स्थलांतरीत मजूर देखील रॉकेल उपलब्धतेनुसार रॉकेल वितरणास पात्र राहतील. (केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Kerosene Prices Surge Amid LPG Shortage: Ration Shops to the Rescue

Web Summary : Kerosene demand spikes as LPG shortages hit Maharashtra due to Middle East tensions. Ration shops restart kerosene distribution at ₹60/liter, while black market prices soar. Priority to AAY, PHH cardholders; others may qualify based on availability.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण