शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेसाठी नेमके विद्यार्थी किती?

By admin | Updated: August 20, 2014 01:02 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने

नामांकन नोंदणीचा आकडा गुलदस्त्यात : विद्यापीठाचे मौन संशयास्पदनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना १४ आॅगस्टची मुदत दिली होती. परंतु ही मुदत उलटून ५ दिवस उलटून गेल्यानंतर अद्याप विशेष परीक्षेला बसणारे नेमके विद्यार्थी किती याचा आकडा नसल्याची सबब विद्यापीठाकडून समोर करण्यात येत आहे. महाविद्यालयांनी दावा केल्यापेक्षा कमी विद्यार्थी असण्याची दाट शक्यता असून यासाठीच हा आकडा लपविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठाने यासंदर्भात मौन धारण केले आहे.एकही नियमित शिक्षक नसल्याच्या कारणावरून विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. असे असताना यातील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा केला. या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेला राज्यपाल कार्यालयाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्रशासन तयारीला लागले आहे. विशेष परीक्षेकरिता ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थी पात्र असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसतील ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणीसाठी माहिती १४ आॅगस्टपर्यंत तर परीक्षा अर्ज २१ तारखेपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. नामांकन करण्यासाठीची अंतिम मुदत टळून ५ दिवस झाले असताना अद्याप नेमके विद्यार्थी किती याची आकडेमोड झाली नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनीदेखील माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे नेमकी माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर धोंड यांनी दिले.जर विद्यापीठाला २८ तारखेपासून परीक्षा घ्यायची आहे तर नेमक्या किती विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी होणार आहे याची माहिती लपविण्याचे नेमके कारण काय याबद्दल निरनिराळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे.महाविद्यालयांनी दावा केल्याप्रमाणे ६,६१६ इतके विद्यार्थीच नसून वास्तविक आकडा हा फारच कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून माहिती देण्यात चालढकल करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.