शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अर्थकारणात रघुनाथ पाटलांना काय कळते?

By admin | Updated: December 30, 2014 01:31 IST

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी आणखी एका वादाला निमंत्रण दिले.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी आणखी एका वादाला निमंत्रण दिले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतीच्या आर्थिक तरतुदीवर परिणाम होत असल्याचे म्हटले होते. त्याचे खडसेंनी समर्थन केले. मात्र राजन यांच्या वक्तव्यास रघुनाथ पाटील यांनी विरोध करत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, पाटील यांना शेतीचे कळत असले तरी, आर्थिक ज्ञान नाही. द्राक्षबागा व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शासनाने दिलेली मदत तोकडी आहे. केंद्राच्या मदतीने बागायतदारांना अधिकचा निधी शासन देणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करतानाच ओढाताण करावी लागणार आहे. त्यामुळे कृषीसाठी वेगळा अर्थसंकल्प तयार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निर्णय मानेंचा, शासन अंधारातआडत बंदचा निर्णय कृषिमंत्री अथवा सहकारमंत्र्यांना माहिती न देताच स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी पणन संचालक सुभाष माने यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. वस्तुत: निर्णय शेतकरी हिताचा असला तरी आम्हाला त्याची कल्पना नसल्याने व्यापारी, आडतदारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. निर्णयाला दिलेली स्थगिती लवकरच उठविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.