शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत तुकोबारायांचे पालखीचे स्वागत

By admin | Updated: June 20, 2014 22:40 IST

आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचला पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.

पिंपरी: आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचला पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. महापौर मोहिनी लांडे, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी, नगरसेवकांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत नामदेव भेटीचे शिल्प दिंडीप्रमुखांना देऊन गौरव केला. 
पालखीच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली होती. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात  वारक:यांच्या स्वागतासाठी शहराच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाने पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मंडप उभारले होते. संतांची पालखी, वैष्णवांच्या मेळ्याचे आगमन हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी पालखी मार्गाकडे आतुरतेने डोळे लावून नागरिक उभे होते. पाचच्या सुमारास ‘ग्यानबा-तुकाराम’ असा नामघोष कानी पडला. देहूरोडकडून निगडीच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना मावळतीच्या सूर्यकिरणांनी चकाकणारा चंदेरी पालखी रथ नजरेस पडताच सर्वाच्या नजरा त्याच दिशेने वळाल्या. 
खांद्यावर भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करीत तल्लीन होऊन वारीची वाट चालणा:या वारक:यांच्या दिंडय़ा रथापुढे मार्गक्रमण 
करीत होत्या. 
भक्ती-शक्ती चौकात पालखी सोहळा दाखल होताच मोठी गर्दी झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. रथ जवळ येताच नागरिक दर्शनासाठी पुढे येत होते. वारक:यांना फराळ देण्यासाठी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक सरसावले होते. 
महापालिकेच्या कक्षात आमदार विलास लांडे, माजी महापौर आर एस कुमार, विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक रामदास बोकड, शमीम पठाण, मोरेश्वर भोंडवे, बाबा धुमाळ, अरुणा भालेकर, शांताराम भालेकर, नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते.
वारक:यांची सेवा घडावी, या उद्देशाने कोणी पाण्याची बाटली, तर कोणी फराळाचे पदार्थ, फळे वाटत होते. निगडी उड्डाणपुलावर पालखी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणो- मुंबई महामार्गावरील निगडीकडील वाहतूक काही काळ बंद ठेवली होती. भक्ती-शक्ती चौकातून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा आकुर्डीतील विठ्ठलवाडीत विसावला. शनिवारी सकाळी 6ला विठ्ठलवाडीतून पालखी मार्गस्थ होईल. खराळवाडीतील विठ्ठलमंदिराजवळ 8 च्या सुमारास विश्रंतीसाठी थोडा वेळ थांबून 12 ला दुपारची विश्रंती दापोडीत होईल. त्यानंतर पुण्याच्या दिशेने सोहळा मार्गस्थ होईल.