शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गावक-यांनी स्वनिधीतून साकारली जलसमृद्धी!

By admin | Updated: September 13, 2016 15:01 IST

जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ -  जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली असून पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. 
शेलुबाजार या गावाच्या एका बाजूने वाहणा-या अडाण नदीच्या खोलीकारणाचा विषय उन्हाळ्यात ऐरणीवर आला. नदीपात्रात नियमित गाळ जमा होऊन तिचे पात्र उथळ बनले होते. त्यामुळे पावसाळ्यात ओसंडून वाहणाºया नदीच्या पाण्यामुळे अनेकवेळा परिसरातील २५० हेक्टर जमिनीवरील पिकांना कायमचा धोका लागून होता. विशेष गंभीर बाब म्हणजे नदीचे पाणी थांबत नव्हते. यामुळे ही नदी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच कोरडी पडत होती. त्यामुळे  नदीकाठी वसलेल्या गावांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असे. त्यावर मात करण्यासाठी अडाण नदीच्या पत्रातील गाळ उपसणे हा पर्याय समोर आला. वारंवार पाणीटंचाईचा सामना करणा-या गावक-यांनी अधिक विलंब न लावता एकत्रित येऊन लोकसहभागातून नदीमधील गाळ उपसण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार १००० ते ११०० रुपये वर्गणी गोळा केली. यामधून सुमारे १३ लक्ष रुपये गोळा झाले. याआधारे ४०० मीटर लांब पात्रामधील गाळ उपसून त्याची रुंदी ३५ मीटरपर्यंत; तर खोली ३ मीटर करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रात पाणी साठायला लागले. यासह परिसरातील इतर जलस्त्रोतही पाण्याने तुडूंब झाले आहेत.
 
‘सीएसआर’मधून मिळाले १९ लक्ष
 
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या कामाची पाहणी करून तातडीने ‘सीएसआर’ फंडातून १९ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून ८०० मीटर लांब नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.