शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या निष्क्रियतेमुळेच घरात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:39 IST

सिंहगड रस्त्यावरच्या नदीकाठालगतच्या वसाहतीत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील सर्व रहिवासी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संतापले

पुणे : सिंहगड रस्त्यावरच्या नदीकाठालगतच्या वसाहतीत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील सर्व रहिवासी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संतापले आहेत. राष्ट्रीय हरित लवाद व न्यायालयातही पालिकेने प्रभावीपणे बाजू मांडली गेली नाही. त्यामुळेच संरक्षक भिंत पाडावी लागली व पाणी सोसायट्यांमध्ये शिरले असा ठपका नागरिकांनी ठेवला आहे. पाणी शिरल्यानंतरही पालिकेने दुर्लक्षच केले असल्याची त्यांची भावना आहे.या परिसरातील ९ सोसायट्यांमधील ११२ कुटुंबांना पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. पाऊस चांगला झाला, धरणातील पाणी वाढले की अशा वेळी त्यांच्यासह या परिसरातील अन्य सोसायट्यांनाही दरवर्षी हा त्रास सहन करावा लागणार आहे. नदीपात्र निश्चित नाही, पूररेषा निश्चित नाही, तरीही अनेक इमारती उभ्या राहिलेल्या, त्यांना पालिकेची रीतसर परवानगी असल्याने अनेकांनी तिथे सदनिका खरेदी केल्या. इमारती बांधणारे, त्यांना परवानगी देणारे सगळे आता बाजूला झाले आहेत. सदनिका खरेदी करून तिथे राहणारे सर्वसामान्य नागरिक मात्र यात अडकले आहेत. पालिकेने या भागातून सिंहगड रस्त्याला पर्याय म्हणून रस्ता तयार केला होता. त्यासाठी नदीपात्राच्या कडेला संरक्षक भिंत बांधली होती. त्यामुळे या इमारती पुराच्या पाण्यापासून संरक्षित झाल्या होत्या. पर्यायी रस्त्याचाही वापर सुरू होता. मात्र, एका स्वयंसेवी संस्थेने या नदीपात्रात बांधकाम करता येत नाही अशी भूमिका घेत पालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली. त्या दाव्यात पालिकेने प्रभावीपणे बाजू मांडलीच नाही. त्यामुळे निकाल विरोधात गेला. रस्ता उखडावा लागला, संरक्षक भिंतही पाडावी लागली, असे या भागातील एकतानगरी रहिवासी संघाचे पदाधिकारी सोमनाथ गिरी यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालामुळे नोटिशीची टांगती तलवारही कायमची असल्याचे गिरी म्हणाले. >स्थानिक नगरसेवकांचीही तक्रारपुराच्या पाण्यात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लागणारी कसलीही साधनसामग्री पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नसल्याची तक्रार नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. पालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवित आहे, प्रत्यक्षात मात्र काहीही होत नाही अशी टीका त्यांनी केली. धरणातून पाणी सोडल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी रवी पवार यांच्यासमवेत विठ्ठलवाडी परिसरात गेले असता त्या वेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या परिसराची पाहणीच झाली नसल्याचे निदर्शनास आले. वास्तविक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. अशा वेळी नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी विशिष्ट यंत्रसामग्री लागते. ती चालविणारे प्रशिक्षित कर्मचारी लागतात. यापैकी काहीही पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नाही असे नागपुरे यांनी म्हटले आहे. >पालिका आता या परिसरात कसलेही काम करायला तयार नाही. रस्ता उखडलेला राडारोडा नदीपात्रात टाकण्यात आला. त्यामुळे खोली कमी होऊन पाण्याचा फुगवटा वाढला. एका खासगी भूखंड मालकामुळे पात्र वळविण्याचा प्रकार झाला आहे, त्याकडे पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे, असे गिरी यांनी सांगितले.