कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले; रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 09:12 PM2020-06-17T21:12:40+5:302020-06-17T21:20:10+5:30

राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस

Warning of heavy rains in Ratnagiri, Sindhudurg; Rain in kokan, goa,central maharashtra | कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले; रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले; रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ जून रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताकोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात पणजी, संगमेश्वर, देवरुख १५०, कानोकोण, मडगाव, सांगे, वैभववाडी १४०, वाल्पोई १३०, मारमागोवा, केपे, सावंतवाडी १२०, दाभोलीम, दोडामार्ग, कणकवली, पेडणे, वेंगुर्ला ११०, देवगड, राजापूर ८०, कर्जत, मुळदे ७०, चिपळूण, मालवण ६०, गुहागर, हर्णे, कुडाळ, रामेश्वरी, रत्नागिरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बºयाच ठिकाणी हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा १६०, राधानगरी १३०, चंदगड ९०, आजारा, कागल ७०, अकोले, गडहिंग्लज, कोल्हापूर, मंगळवेढा, पाचोरा, सांगोला ६०, आटपाडी, भडगाव, गारगोटी, पंढरपूर, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, तळोदा ५०, शहादा, शिरपूर, विटा ४० मिमी पाऊस झाला होता.

 मराठवाड्यात सोयेगाव ४०, शिरुर कासार ३०, अंबड, आष्टी, बदनापूर, भूम, कन्नड, पैठण, परतूर येथे १० मिमी पाऊस पडला. विदर्भात शिंदेवाही ५०, भामरागड, चिमूर, नागभिड, पर्सेनी ४०, अहिरी, बल्लारपूर, कामठी, मूल, राजुरा, साओली, सिरोंचा ३०, चिखलदरा, एटापल्ली, गौड पिंपरी, पोंभुर्णा, वर्धा २०, भद्रावती, चंद्रपूर, धानोरा, जिवती कळमेश्वर, मालेगाव, मौदा, नागपूर, रामटेक, सावनेर, सिंधखेड राजा, वरोरा येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती.

घाटमाथ्यावरील कोयना (नवजा) १००, पोफळी ५०, शिरोटा, धारावी, खंद ताम्हिणी २०मिमी पाऊस पडला होता. १८ जून रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

इशारा : १८ जून रोजी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. १९ ते २१ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .

..........

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ जून रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात १८ जून रोजी जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Web Title: Warning of heavy rains in Ratnagiri, Sindhudurg; Rain in kokan, goa,central maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.