ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:42 AM2024-05-20T10:42:49+5:302024-05-20T10:43:04+5:30

ऐश्वर्या रायच्या हाताला गंभीर दुखापत, लवकरच सर्जरी करणार

Aishwarya Rai may go through surgery as she has hand injury dispite of this she attended Cannes Festival | ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) हजेरी लावत फेस्टिव्हलची शोभा वाढवली. 2002 पासून प्रत्येक वर्षी ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. दरवर्षी तिच्या आकर्षक फॅशनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. कधी तिच्या आऊटफिटची तर कधी तिच्या लिपस्टीक शेडची चांगलीच चर्चा झाली. यंदाही ऐश्वर्याचा लूक चर्चेत होता. पण त्याहून जास्त चर्चा होती ती म्हणजे हाताला फ्रॅक्चर असूनही ती या फेस्टिव्हलमध्ये आली होती.

ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरुन कान्ससाठी रवाना झाली होती. तिच्यासोबत लेक आराध्याही दिसली. ऐश्वर्याच्या हाताला फ्रॅक्चर झालेलं दिसलं आणि चाहते चिंतेत पडले. या अवस्थेतही तिने कान्समध्ये सहभागी होण्याची परंपरा मोडली नाही. कान्सच्या रेड कार्पेटवरही ऐश्वर्या ग्लॅमरस लूकमध्ये होती मात्र तिच्या हाताला पट्टी बांधलेली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तिला नक्की कशामुळे दुखापत झाली ते समजलेलं नाही. मात्र या महिन्याच्या शेवटी तिच्या हाताची सर्जरी होणार असल्याची माहिती आहे. डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टशी सल्लामसलत करुनच ती कान्समध्ये सहभागी झाली होती. आता तिच्या हातावर शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचं कळतंय.

ऐश्वर्या रायने यंदा कान्समध्ये दोन लूक केले होते. पहिल्या दिवशी ती ब्लॅक अँड गोल्डन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. तर दुसऱ्या लूकसाठी तिने  मोरपंखी आणि सिल्व्हर गाऊन परिधान केला होता. यातही तिचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. रेड कार्पेटवर येण्यापर्यंत लेक आराध्याने आईची साथ दिली. आईला दुखापत झाली असल्याने आराध्या तिचा आधार बनली होती. 

Web Title: Aishwarya Rai may go through surgery as she has hand injury dispite of this she attended Cannes Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.