शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेला वाट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 04:50 IST

विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये

जमीर काझी,

मुंबई- विघ्नहर्त्याच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरल्याने महाराष्ट्रात उत्साही वातावरण असताना त्याचा फटका रुग्णांना बसू नये, यासाठी पोलिसांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वाहने सावकाश चालवा, रुग्णवाहिकेला वाट करून द्या, अशी साद राज्यभरातील पोलिसांकडून गणेशभक्तांना घातली जाणार आहे. मिरवणूक व सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना बेशिस्त वाहनांमुळे अपघात होऊ नये, तसेच रुग्णांना वेळेत रुग्णालयामध्ये नेता यावे, यासाठी ‘गणपती उत्सव थीम-२०१६’ ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे.राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी त्याबाबत पोस्टर लावून नागरिकांना आवाहन करावे, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना केली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मिरवणूक, वाहनांच्या गर्दीमुळे रुग्णांना घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा होत असतो. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम मुंबईतील राधी डिझास्टर अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने केले जाते. त्यानुसार प्रत्येक पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या कालावधीत रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आल्यास मार्गावरील वाहने डाव्या बाजूला ठेवणे तसेच हळू चालविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करावयाची आहे. (प्रतिनिधी)>नागरिकांनी खबरदारी घ्यावीमहाराष्ट्रात नऊ पोलीस आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालये आहेत. त्याअंतर्गत एकूण १ हजार ७६ पोलीस ठाणी असून, त्यांच्या हद्दीतील प्रत्येक गणेशोत्सव मंडळामार्फत ‘स्लो ड्राइव्ह आणि वे टू अ‍ॅम्ब्युलन्स’ याबाबत जनजागृती केली जाणार आहे.गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. अपघातात एकूण मृत्युमुखी पडणाऱ्या दर पाच व्यक्तींमध्ये एकाचा मृत्यू हा वेळेत उपचार न मिळाल्याने होतो. त्यामुळे याबाबत प्रत्येक पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सव मंडळांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाईल. - सतीश माथूर (पोलीस महासंचालक)