शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

खापरीत वॅगनला आग

By admin | Updated: July 10, 2014 00:58 IST

खापरी रेल्वेस्थानकावर एका वॅगनला बुधवारी दुपारी ४.१० वाजता अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना देताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर

अनर्थ टळला : रेल्वे प्रशासनात खळबळ नागपूर : खापरी रेल्वेस्थानकावर एका वॅगनला बुधवारी दुपारी ४.१० वाजता अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना देताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर दुपारी ४.३० वाजेपर्यंत नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे सहा रेल्वेगाड्यांना नागपूर, अजनी, गुमगाव रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले. दरम्यान, खापरी रेल्वेस्थानकावर उभी असलेली ही वॅगन मार्च महिन्यापासून तेथे उभी असल्यामुळे रेल्वे प्रशासन सुरक्षेप्रति किती गंभीर आहे, याची प्रचिती आली.खापरी रेल्वेस्थानकावर मार्च महिन्यापासून उभ्या असलेल्या एका वॅगनच्या पाहणीसाठी एचपीसीएल आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे अधिकारी दुपारी ४.१० वाजता खापरी रेल्वेस्थानकावर पोहोचले. हे वॅगन नागपूर एण्डकडे रेल्वेस्थानकापासून ४०० मीटर अंतरावर होते. पाहणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी या वॅगनची तपासणी करण्यासाठी वॅगनचे झाकण उघडताच अचानक आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला.लगेच आगीची सूचना अग्निशमन विभागास देण्यात आली. अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचून दुपारी ४.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीची सूचना मिळताच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यामुळे रेल्वेगाडी क्रमांक ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेसला गुमगाव स्टेशनवर ४.४० ते सायंकाळी ६ पर्यंत, १२५१२ राप्तीसागर एक्स्प्रेसला गुमगाव स्टेशनवर दुपारी ४.५६ ते सायंकाळी ५.५२, १२८३३ हावडा एक्स्प्रेस बुटीबोरी स्टेशनवर १ तास, १२९०६ हावडा-पोरबंदर-ओखाला अजनी स्टेशनवर दुपारी ४.२५ ते सायंकाळी ६.०५, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसला अजनी स्टेशनवर सायंकाळी ५.३८ ते ६.०८ पर्यंत आणि १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसला नागपूर स्टेशनवर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आले. आग लागलेली वॅगन मार्च महिन्यापासून खापरी रेल्वेस्थानकावर उभी असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)