शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विठूचा गजर हरीनामाचा...

By admin | Updated: July 14, 2015 00:00 IST

पुणे जिल्ह्यातील खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या वतीने यंदा सलग १७ व्या वर्षी वारकरी भक्तांसाठी पिठले भाकरीची मेजवानी देण्यात आली. यवतमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम व सर्व जाती-धर्मांतील नागरिक पहाटे पाचपासून हजारो भाक-या घरी बनवून श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देतात.ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने ...

पुणे जिल्ह्यातील खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या वतीने यंदा सलग १७ व्या वर्षी वारकरी भक्तांसाठी पिठले भाकरीची मेजवानी देण्यात आली. यवतमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम व सर्व जाती-धर्मांतील नागरिक पहाटे पाचपासून हजारो भाक-या घरी बनवून श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देतात.

ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज नागमोडी वळणाचा चार कि.मी.चा अवघड दिवे घाट लीलया पार केला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी १२ जुलै रोजी रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला.

राज्यातील शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणा-या देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा नेवासा येथे शनिवारी ११ जुलै रोजी पार पडला.

संत सोपानकाका पालखीचे प्रस्थान : "ग्यानबा-तुकाराम"च्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या निनादात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकामहाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी सोमवारी १३ जुलै रोजी सासवड येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.

टाळमृदंगाच्या निनादात व टाळ-चिपळ्यांच्या तालावर वारकरी मंत्रमुग्ध झाले. जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आला. त्यावेळी हजारो भाविकांनी सोहळय़ाचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी पालखी सोहळय़ावर फुलांचा वर्षाव केला.

दरवर्षी आषाढ आला की लाखोंच्या संख्येने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूराकडे चालू लागतात.

रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींची तपोभूमी वाल्हेनगरीत समाज आरतीमध्ये माऊलीचे विश्‍वरूपदर्शन अनुभवले

बेभान होऊन नाचणारे वारकरी.. डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन धावणार्‍या महिला आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम अशा जयघोषात वारी सुरु आहे.

लाल मातीची धूळ उडवीत वार्‍याला मागे सोडून वेगात धावणारे कृष्णवर्णीय अश्‍व ... त्याच्या टापाखालील माती उचलून मनोभावे कपाळाला लावणारे भाविक.. असे दृश्य तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण पार पडताना दिसत होते.

ग्यानबा-तुकारामच्या टिपेला पोचलेल्या सूरात रिंगण सोहळ्याला आलेला पूर.. अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी दुपारी इंदापूर येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण करणा-या वारीची ही एक झलक