शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चुरस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 10:59 IST

भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे. 

मुंबई - हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावल्या गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावे लागले. अनपेक्षीतपणे विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. आता विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेता नियुक्त करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू आहे. या पदासाठी पक्षात आता चुरस निर्माण झाली आहे.

2014 ते 2019 या कालावधीत भाजपच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी चंद्रकांत पाटील विराजमान होते. मात्र ते आता विधानसभेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेत भाजपकडून विरोधीपक्षनेते पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये विदर्भातील डॉ. परिणय फुके यांचे नाव आघाडीवर आहे. फुके यांच्याव्यतिरिक्त प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि भाई गिरकर यांचे नावही चर्चेत आहेत. 

विधान परिषदेत भाजपचे 22 सदस्य आहेत. तर रासप आणि दोन अपक्षांचे भाजपला समर्थन आहे.  याआधी भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला अनेक दिवस मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांना पुन्हा संधी मिळणे कठीण दिसत आहे. तर भाई गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे.