शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात बोगस खते व बियाण्यांची भरमार!

By admin | Updated: June 1, 2015 01:42 IST

बोगस खताचा साठा सापडल्यानंतर कृषी विभाग झाला जागा.

अकोला : पश्‍चिम विदर्भात बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अकोला जिल्हय़ातही यंदा अप्रमाणित सोयाबीनचे बियाणे विक ले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली असून कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. पश्‍चिम विदर्भातील ही पहिलीच कारवाई आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही कारवाई केली असली तरी बोगस बीटी कापसाचे बियाणे खुलेआम विकणार्‍यांवर केव्हा कारवाई होणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ व इतर जिल्हय़ात गेल्यावर्षी अप्रमाणित, बोगस बियाण्यांचा साठा सापडला आहे. बोगस रासायनिक खतेही आढळून आली आहेत; गेल्यावर्षी आकोटात सोयाबनीचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होता. यावर्षी मुर्तिजापुरात अकोला जिल्हा कृषी विभाग व गुण नियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांना बोगस खताचा साठा आढळून आला आहे. यंदा प्रमाणित सोयाबीन बियाण्यांची वाणवा असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे तर लागणारच आहे, शिवाय शेतकर्‍यांनादेखील काळजीपूर्वक बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. दरम्यान, शनिवारी सापडलेला बोगस खताचा साठा या ठिकाणाहून किती प्रमाणात विकला गेला, हा मोठा प्रश्न असून, ही खते शोधून काढण्यासाठी अधिकार्‍यांची कसोटी लागणार आहे. लोकमत'ने यासंबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष. यासंदर्भात एस आर सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभाग दक्ष असल्याचे सांगीतले. बीटी कापसाच्या बियाण्याची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी राहणार आहे. बीटी बियाण्याची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार आहे आणि अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बोगस खताची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभाग दक्ष असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला.   कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषिसेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकर्‍यांनी १८00२३-३४000 या क्रमांकावर संपर्क साधावा.