शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतींनी केली ग्रंथसंपदेची पाहणी

By admin | Updated: September 25, 2014 06:12 IST

अन्सारी यांनी मंगळवारी सोफिया महिला महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळेपणे संवाद साधला

मुंबई : उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी तीन दिवसांच्या आपल्या मुंबई भेटीच्या शेवटच्या दिवशी दोनशे दहा वर्षे जुन्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला आज भेट देऊन तेथील ग्रंथसंपदा, हस्तलिखिते, प्राचीन नाणी व वस्तू तसेच दुर्मीळ नकाशांचे निरीक्षण केले. या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती दुपारी दिल्लीला रवाना झाले.अन्सारी यांनी मंगळवारी सोफिया महिला महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळेपणे संवाद साधला. या कार्यक्रमानंतर त्यांनी कुलाबा येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेला (टीआयएफआर) भेट दिली. या वेळी त्यांनी संस्थेतील प्राध्यापक आणि पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. डॉ. होमी भाभा यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा प्रवास दर्शवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालादेखील त्यांनी या वेळी भेट दिली. निव्वळ विज्ञानावर आधारित करिअरकडे देशातील जास्तीत जास्त बुद्धिमान लोकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची आणि या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळवून देण्याची मागणी या वेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी त्यांच्याकडे केली.बुधवारी उपराष्ट्रपतींनी फोर्ट येथील दोनशे दहा वर्षे जुन्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी येथील ग्रंथसंपदा, हस्तलिखिते, प्राचीन नाणी व वस्तू तसेच दुर्मीळ नकाशांचे निरीक्षण केले.या वेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, संस्थेचे अध्यक्ष शरद काळे, डॉ. अनिल काकोडकर, प्रो. जे.व्ही. नाईक, डॉ. अरुण टिकेकर, न्या. सुजाता मनोहर, न्या. बी.एन. श्रीकृष्ण, डॉ. अशोक जामसंडेकर, डॉ. मीना वैशंपायन, डॉ. मंगला सरदेशपांडे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)