शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 4:22 AM

कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला.

मुंबई :  कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. शनिवारी महापालिकेने केवळ १९२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली होती. मात्र यापुढे दररोज चार हजार जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आठवड्यातून चार दिवस ही लसीकरण माेहीम राबवली जाईल.कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. मात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना संदेश गेलेच नाहीत. त्यामुळे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांसाठी ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.अखेर यात सुधारणा झाल्याने मंगळवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. महापालिकेच्या नऊ केंद्रांवरील ४० बूथवर दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लस दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५०० लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना मोबाइलवर संदेश जाणार असले तरी पालिकेकडूनही लाभार्थ्यांना संदेश पाठवले जाणार आहेत. लसीकरण सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत केले जाणार होते. मात्र, आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच लसीकरण होईल, असे पालिकेने स्पष्ट केले.संदेश पोहोचलेच नाहीतलसीकरणाच्या दिवशी ज्या लाभार्थ्यांना लस द्यायची होती, त्यांना एक दिवस आधी एसएमएस पाठवले जाणार होते. मात्र, कोविन ॲपवरून संदेश पोहोचलेच नाहीत. आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पालिकेने फोन व एसएमएस करून लाभार्थ्यांना लसीकरणाला उपस्थित राहण्यास सांगितले. लस घेतल्यानंतर ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑफलाइन नोंदणी करण्याची मागणी राज्याच्या टास्क फोर्समार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने त्याला नकार दिल्याने कोविन ॲपमध्ये सुधारणा होईपर्यंत लसीकरणाला स्थगिती देण्यात आली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस