शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण नोंदणीच्या नावे होऊ शकते फसवणूक, सायबर पोलीस; सावध राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:27 IST

महाराष्ट्र सायबर विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणात, लसींच्या तुटवड्यामुळे लस मिळणार की नाही, अशी चिंता अनेकांना आहे.

 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नामसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता ठगांनी लसीकरण नोंदणीच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून फसवणूक सुरू केली आहे. त्यामुळे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले.महाराष्ट्र सायबर विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणात, लसींच्या तुटवड्यामुळे लस मिळणार की नाही, अशी चिंता अनेकांना आहे. नागरिकांच्या याच भीतीचा फायदा घेऊन ठग शासनाच्या नामसाधर्म्य दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक करत आहेत. लसीसाठी नोंदणी करण्याचा संदेश पाठवून त्याखाली लिंक पाठविण्यात येत आहे किंवा कॉल करून  लवकर लस मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन यादव यांनी केले.  संदेशाखालील अनोळखी लिंक उघडू नका. ती डाऊनलोड केल्यास मालवेअर, व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक हाेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

रेमडेसिविरच्या नावाखालीही गंडा- कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देताे, असे सांगत संदेश पाठवून ठगण्याचा धंदा सुरू आहे. - यात, रेमडेसिविर उपलब्ध असल्याबाबत सोशल मीडियावर जाहिरात करण्यात येते. - जाहिरात बघून सावज जाळ्यात अडकताच त्यांना रेमडेसिविरसाठी ५० टक्के रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडून ठग नॉट रिचेबल होतात. - अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी खातरजमा केल्याशिवाय कुठेही पैसे पाठवू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर