शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणार

By admin | Updated: July 5, 2017 05:11 IST

राज्य पोलीस दलाचे मुख्यालय असलेल्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कित्येक वर्षांपूर्वीच्या अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी

जमीर काझी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलाचे मुख्यालय असलेल्या पोलीस महासंचालक कार्यालयातील कित्येक वर्षांपूर्वीच्या अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या यादीच्या संकलनापासून या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे. राजीनामा दिलेल्या आणि निवृत्त झालेल्या २५०वर अधिकाऱ्यांची नावे निरीक्षकासाठीच्या पदोन्नतीसाठी गृहीत धरलेल्या यादीत होती. ‘लोकमत’ने सोमवारी त्याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी त्याची दखल घेतली आहे. सर्व पोलीस घटकातून त्वरित माहिती मागवून ती ‘अपडेट’ करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. येत्या महिन्याअखेरपर्यंत ७००वर अधिकाऱ्यांची बढती केली जाईल. पोलीस दलातील निरीक्षक पदाच्या रिक्त असलेल्या ७६३ पदांसाठी पात्र अधिकाऱ्यांना येत्या पंधरवड्यात पदोन्नती दिली जाणार आहे. त्यासाठी मुख्यालयातील आस्थापना विभागाने पदोन्नतीसाठी विचाराधिन असलेल्या १५५१ अधिकाऱ्यांची नावे नुकतीच जाहीर केली आहेत. मात्र त्यामध्ये दहा वर्षांपूर्वी खात्याचा राजीनामा दिलेला ख्वाजा युनूस हत्येप्रकरणातील वादग्रस्त एपीआय सचिन वाझे याच्यासह सेवानिवृत्त, निलंबित व काही मृत झालेल्या अधिकाऱ्यांच्याही नावांचा समावेश आहे. याबाबत संबंधित पोलीस घटकांकडून त्या त्या वेळी मुख्यालयाकडे माहिती पाठवूनही ती ‘अपडेट’ करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला होता. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणली. त्यानंतर महासंचालक माथूर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढले. कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती ‘अपडेट’ ठेवण्याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या एकाही अधिकाऱ्यावर अन्याय होता कामा नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले. अन्याय होणार नाहीसेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयात काही याचिका प्रलंबित होत्या. त्यामुळे २०१४पासून अधिकाऱ्यांची यादी ‘अपडेट’ करण्यात आलेली नव्हती. आता त्याचे काम सुरू असून, सर्व घटकप्रमुखांना त्याबाबत त्वरित माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. पदोन्नतीला पात्र असणाऱ्या एकालाही डावलू दिले जाणार नाही. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. - राजेंद्रसिंह, अपर महासंचालक, आस्थापना