शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कलेचे अभूतपूर्व दर्शन

By admin | Updated: January 28, 2015 01:06 IST

राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित विद्यार्थी विभागाच्या ५५ व्या राज्यकला प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खा. बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कला

राज्य कला प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन : ज्येष्ठ चित्रकार साऊरकर यांचा सत्कार नागपूर: राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित विद्यार्थी विभागाच्या ५५ व्या राज्यकला प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खा. बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कला संचालक प्रा. गोपीनाथ वाघमारे उपस्थित होते. शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात राज्यातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कलाक्षेत्रात विशेष योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रकार प्रा. श्रीकृष्ण साऊरकर यांचा स्वपत्नीक सत्कार करण्यात आला. कलेचा वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कलांवर आधारित, एक भव्यदिव्य कलाप्रदर्शन नागपूर येथे आज सुरू झाले. राज्यकला प्रदर्शनानिमित्ताने मूलभूत अभ्यासक्रम, रेखा व रंग कला, शिल्पकला, उपयोजित कला, कला शिक्षण प्रशिक्षण, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकला, धातूकला विभागाच्या ९७० उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. अथवा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.कला संचालनालयातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्य कलाप्रदर्शन (विद्यार्थी विभाग) आयोजित केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांची सुप्तशक्ती लाभलेल्या उदयोन्मुख कलाकारांच्या कलाप्रतिभेला प्रोत्साहन मिळण्याच्या हक्काच्या व्यासपीठावर राज्य कलाप्रदर्शन या नावाने आयोजित कला उपक्रमामध्ये, यासर्व निवडक कलाकृती प्रदर्शित केल्या जातात. ५५व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदशर्नासाठी या वर्षी ५१७० एवढ्या मोठ्या प्रमाणात सुमारे ३०० इतक्या कला महाविद्यालयाच्या कला विद्यार्थ्यांनी कलाकृती पाठविल्या होत्या. या कलाकृतींमधून कला संचालनालयाच्या संबंधितांनी नेमलेल्या परीक्षकांनी त्यांच्या-त्यांच्या विचारांनुसार निवडलेल्या-परीक्षण केलेल्या ९८० एवढ्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. माजी खा. बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना आपली कला राष्ट्राला सर्मपित करण्यास सांगितले. कला क्षेत्राचे खरे स्थान नागपुरात असून कलासंचानलायाने हे प्रदर्शन नागपुरात आयोजित करुन कलावंतासाठी एक नवे वातावरण तयार केले आहे. शिवाय मेहनतीला पर्याय नाही तेव्हा तुम्ही मेहनत करा तुम्हला फळ नक्कीच मिळेल, असा मोलाचा सल्ला दिला. ज्येष्ठ चित्रकार साऊरकर यांनी अशा प्रकारच्या आयोजनामुळे कला जोपासली जाते अथवा हा सत्कार माझ्या आयुष्यात केलेल्या माझ्या कार्याची ही पावती असल्याचे ते म्हणाले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, उपकला संचालक रोहिदास झोंबाडे, कला निरीक्षक दिलीप बोरले, नागपूर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर अथवा राज्यातील कलाशिक्षण संस्थांचे विद्यार्थी, पालक, कलाप्रेमी उपस्थित होते.कलेला आणि कलेच्या प्रतिभाशक्तीला वयाची अट नसते. प्रत्येक कलाकार हा त्याच्या तुटपुंज्या आयुष्यभर शिकतच असतो. हजारो कलाकृतींमधून निवडण्यात आलेल्या या कलाकृती पाहण्याची कलाकार व कलारसिकांना उत्सुकता असते. म्हणूनच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी विद्यार्थी विभागाचे हे राज्य कलाप्रदर्शन आयोजित करण्यात येते.जलरंग, तैलरंग, क्रॅलिक रंग, पेन्सिल, रंगीत पेन्सिल, पेस्टल रंग, चारकोल, पावडर रंग ही झाली रंगमाध्यमे! यांच्यापासून विविध प्रकारच्या पोतांच्या (टेक्स्चर्सच्या) कागदांंवर, कॅनव्हासवर कलाकार त्याच्या मनातील आकार दृश्य स्वरूपात आणतो. शिल्पकला प्रकारात विविध प्रकारचे दगड, विविध प्रकारचे धातू, लाकूड, फायबर, प्लॅस्टिक्स, काच, माती, टेराकोटा, सिरॅमिक्स, कापड अशा विविध माध्यमांद्वारे त्रिमितीकार सादर केलेले असतात. अनेक कलाकृती असतात की, ज्या अक्षरश: थक्क करून सोडतात. या प्रदशर्नात असाही एक अनुभव असतो. सामाजिक, राजकीय, प्रासंगिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, आर्थिक, पौराणिक अशा विविध विषयांवर आधारित कलाकृती पाहताना कला विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो. दि. २७ जानेवारीपासून सप्ताहभर हे प्रदर्शन नागपूरच्या चित्रकला महाविद्यालय येथे विनामूल्य खुले राहणार असून, हजारो-लाखो कलारसिक व कला विद्यार्थी या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन कला संचालक गो. गो. वाघमारे अथवा महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.प्रफुल्ल क्षीरसागर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)