शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

भैया देशमुखांचे अनोखे आंदोलन

By admin | Updated: July 26, 2014 02:12 IST

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांना शेतीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. या वेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देशमुख यांनी साडी परिधान करून नाटय़मयरीत्या हे लोटांगण घातले.
गेल्या कैक वर्षापासून मंगळवेढय़ातील 35 गावांना शेतीचे पाणी पुरवणारा प्रकल्प राबवण्याची मागणी होत आहे. मात्र आघाडी सरकारने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. 9 जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देत गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आझाद मैदानात धरणो आंदोलन करीत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी पाच मिनिटेही नसल्याने मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी लोटांगण आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अडवणूक करू नये, म्हणून सकाळी सात वाजताच पोलिसांची नजर चुकवून देशमुख काही कार्यकत्र्यासह आझाद मैदानातून बाहेर पडले. त्यानंतर प्रत्येकी दोन-दोन कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर आणि सह्याद्री अतिथीगृहाबाहेर घुटमळत होते. आंदोलनाचा सुगावा लागल्याने सकाळपासून मलबार हिल पोलिसांनी कार्यकत्र्याची धरपकड सुरू केली होती.  दुपारी साडेबारा वाजता देशमुख टॅक्सीतून सह्याद्री अतिथीगृहासमोर पोहोचले. पोलिसांनी ओळखू नये म्हणून त्यांनी चक्क साडी नेसली होती. टॅक्सीतून बाहेर पडल्या पडल्याच त्यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन-तीन कार्यकत्र्यानीही त्यांना साथ दिली. 
मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने देशमुख यांच्यासह सुमारे 4क् कार्यकत्र्याना ताब्यात 
घेतले. (प्रतिनिधी)