शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमध्ये आता गणवेश बंधनकारक! विद्यार्थिनी सुरक्षेसाठी ‘कौशल्य विकास’ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:17 IST

Uniform is now compulsory in ITI: राज्याच्या विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कौशल्य विकास विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सर्व प्रकारच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक असेल.    

 मुंबई - राज्याच्या विविध संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कौशल्य विकास विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सर्व प्रकारच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक असेल.    

आयटीआय, तंत्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास संस्थांमध्ये विद्यार्थिनींची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक संस्थेत २० विद्यार्थिनींमागे एक महिला निदेशकाची (लोकल गार्डियन) नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर कुठेही जायचे असल्यास या निदेशकांची लेखी परवानगी बंधनकारक असेल. तसेच संस्थेत परवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनींची माहिती तत्काळ पालकांना देण्यात येईल. 

राज्यातील सर्व शासकीय / खासगी आयटीआय, कौशल्य विद्यापीठ, खासगी कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ व शासकीय तांत्रिक विद्यालये या संस्थांना या सूचना लागू असतील. महिला वसतिगृहातील अधीक्षक, सफाई कर्मचारी, पहारेकरी आणि अन्य कामाकरीता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती बंधनकारक असेल. महिला अधीक्षकांना वसतिगृहात वास्तव्य अनिवार्य असेल. वसतिगृहातील भोजन व्यवस्था महिला बचत गटांमार्फत करण्यात यावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.  

पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी केल्यानंतरच सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. विद्यार्थिनींच्या प्रवासी खासगी बस, टॅक्सी, व्हॅनमध्ये एक महिला कर्मचारी ठेवणे सक्तीचे असेल. शिवाय प्रत्येक कॅम्पसमध्ये रुग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राबाबत स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेची मदत घ्यावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना?  कॅम्पसमध्ये कुठेही अंधार नसावा. एक्स्प्रेस फिडरद्वारे अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करावा. तसेच सौरउर्जेद्वारे संपूर्ण संस्थेत वीजपुरवठ्याची सोय असावी.  कॅम्पस ग्रामीण किंवा शहराबाहेर आहेत, अशा परिसरात बाहेरील लोकांचा कॅम्पसमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी सीमा भिंत उभारणे आवश्यक. संस्था प्रवेशद्वार, संस्थेचा दर्शनी भाग, कार्यालय, वर्गखोल्या, कार्यशाळा, स्वच्छतागृहाच्या बाहेरील बाजूस आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.  संस्थेत कंट्रोल रूम असावी आणि तिची तपासणी बीट मार्शल, पोलिस पथकांनी वेळोवेळी करावी.  प्रत्येक संस्थेत “विशाखा समिती” नियुक्त करावी.  

टॅग्स :Educationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज