शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

उलगडली संगीताची भाषा..

By admin | Updated: August 20, 2014 00:25 IST

भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी संगीताची भाषा एकच असते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

पुणो : भाषा वेगवेगळ्या असल्या, तरी संगीताची भाषा एकच असते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आजही  एका कार्यशाळेत वेगवेगळ्या भाषांतील गाण्यांना संगीताचा साज चढवताना हीच गोष्ट अधोरेखित झाली. निमित्त होते मॉडर्न महाविद्यालयाच्या जर्मन विभागातर्फे आयोजित केलेल्या पॉप संगीताच्या कार्यशाळेचे. या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे वैशिष्टय़ हे, की यात शिकवणारा आणि शिकणारे या सगळ्यांनी मिळूनच प्रयोग केले. 
भारतात जर्मन भाषेच्या प्रसाराला सुरुवात होऊन शंभर वर्षे झाली. त्या निमित्ताने जर्मन भाषा विभाग, फग्यरुसन आणि मॉडर्न महाविद्यालयाने काही कार्यक्रम आयोजित केले आहेत. ही कार्यशाळा हा त्याच उपक्रमाचा एक भाग होता. जर्मनीचे प्रथितयश कलाकार योहानेस होफमन यांनी ही कार्यशाळा घेतली. पॉप संगीत हे जर्मनीत आणि इतरत्रही लोकप्रिय आहे. या संगीतावर व्याख्यान देण्याऐवजी त्यांनी समोरच्या विद्याथ्र्याबराबेर प्रत्यक्ष संगीत देणोच पसंत केले. विद्याथ्र्याचे चार गट करून त्यांना एकाच पद्धतीच्या चालीत बसतील, असे शब्द त्यांनी लिहायला सांगितले. विषय होता प्रेमगीत. विद्याथ्र्यानी या विषयावर जर्मन, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रत्येकी चार ओळी लिहायच्या होत्या. या ओळी एकाच वेळी एकमेकांना पूरक 
अशा चालीत बनवायची किमया त्यांनी अवघ्या काही मिनिटांत साधली. ही साधी, सोपी आणि तरीही आकर्षक चाल प्रत्येकाच्या ओठांवर रुळायला वेळ लागला नाही. एकाच वेळी चार भाषांतील प्रेमगीते पॉप संगीताच्या माध्यमातून ऐकणो हा एक वेगळा अनुभव होताच. या सगळ्या अनुभवात विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाल्याने त्याची रंगत आणखीनच वाढली. सुरुवातीला महाविद्यालयातील जर्मन विभागप्रमुख संजीवनी कुवळेकर यांनी स्वागत केले. या वेळी प्राचार्य राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
4योहानेस यांनी माध्यम विषयातील पदवी घेतली असली, तरी संगीत हेच त्यांचे विश्व आहे. पॉप ही त्यांची आवड असली, तरी त्यांनी भारतीय अभिजात संगीतासह सगळ्या प्रकारचे संगीत अनुभवले आहे. मुलांना व्याख्यान देण्याऐवजी त्यांना संगीतनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, ही त्यांचीच कल्पना. भारतात आणि पुण्यात ते दुस:यांदा येत आहेत. या वेळच्या उपक्रमात ते आपल्या आई- रेनेट होफमन यांच्याबरोबर सहभागी झाले आहेत.