शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

समजून घ्या ‘कोरोना’, शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 06:14 IST

कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते.

कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते. शिंकण्यामुळे नाकातील जंतू १०० मैल प्रतितास या वेगाने पुढे जातात. आपल्याला शिंकताना नाकासमोर हात धरा किंवा एका बाजूला होऊन हाताच्या वरच्या भागावर म्हणजे बाहू वर शिंका, असे सांगण्यात येते. कुठल्या प्रकारे शिंकल्यास त्यातून किती दूरवर जंतू जाऊ शकतात हे पाहूया..

१. कुठल्याही अडथळ्याशिवाय शिंकल्यास शिंकेतील जंतू ११ फुटांपर्यंत जातात.२. समोर हात पकडला, तर शिंकेतील जंतू ३.५ फुटांपर्यंत जातात. पण यात हातावर शिंक येते आणि ते हात इतरत्र लागल्यास संसर्गाचा एक मार्ग खुला होतो.३. सध्या सांगितल्याप्रमाणे बाहूवर शिंकले, तरी ही शिंक एका बाजूला ८.५ फुटांपर्यंत जाते म्हणून यासाठी भोवतीच्या लोकांना संसर्ग होणार नाही, यासाठी पुढील गोष्टी केल्या जाऊ शकतात.च्शिंकताना पूर्ण चेहरा मोठा टिश्यू पूर्ण चेहरा झाकेल असा नाकाच्या भोवतीचा भाग झाकेल, असानाकासमोर पकडावा.च्शिंकताना शक्य असल्यास खाली बसावे व बसने शक्य नसल्यास खाली जमिनीकडे बघावे.च्टिश्यू नाकासमोर पकडताना नाक दाबू नये, टिश्यू हा मास्क ज्या जागेवर घट्ट बसतो त्या भागात दाबून पकडावा. टिश्यू पर्याय असू शकतो चेहरा मावेल असा स्टेपलरच्या मदतीने बनवलेला कागदाचा छोटा त्रिकोण बनवून वरच्या खिशात ठेवता येईल. यासाठी छोट्या कागदी बॅग्सचाही वापर करता येईल. आॅफिसमध्ये प्रत्येकाच्या टेबलवर असे त्रिकोण / कागदी बॅग्स बनवता येतील. थोडे इनोव्हेशन करून खास शिकण्यासाठी स्निझिंग बॅग्स बनवता येतील.च्शिंकताना आधी ३० सेकंद शिंक येणार आहे ही जाणीव होते, अशा वेळी खिडकीजवळ जावे.च् तसेच सर्वांनी अशी भावना जाणवली की हात वर करावा. ही शिंक आल्याची एक जागतिक सांकेतिक भाषा बनावी. हात वर केला की आॅफिसमध्ये सोबत बसलेले, सार्वजनिक ठिकाणी लोक शिंकणाऱ्यापासून तोंड दुसºया बाजूला करतील.च्एसी खोली असेल तर खिडकीचा एक कोपरा उघडता येईल असा ठेवावा व त्यानंतर ५ मिनिटे खिडकी उघडी ठेवून एसी बंद ठेवावा.च्गाडीत शिंक आल्यास चालक सोडून इतरांनी फक्त आपली खिडकी उघडून नाकासमोर टिश्यू ठेवून खिडकीकडे तोंड करून शिंकावे, त्या वेळी इतरांनी खिडकी उघडू नये. शिंकून झाले की मात्र सर्वांनी५ मिनिटे खिडकी उघडी ठेवावी.च् चालकाला शिंक आल्यास त्याला हाताला लागेल असे डाव्या बाजूला हँडब्रेक असतो, तिथे टिश्यू ठेवावे व त्याने टिश्यूचा वापर करावा. शिंकून झाल्यावर कधीही हात धुवावे, हात धुणे शक्य नसल्यास हातावर सॅनिटायजर घ्यावा.- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या