शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राधाच्या आक्रमतेपुढे एसटी चालक-वाहक नमले

By admin | Updated: July 9, 2016 17:50 IST

गावात बस आलीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा ‘राधा’ या १२ वीत शिकणा-या तरुणीने घेतला आणि तिच्या त्या आक्रमकतेपुढे एसटी चालकाला नमते घ्यावे लागले

भाऊराव शिंदे / ऑनलाइन लोकमत - 
उपळवटेत सुरू झाली एसटी : विद्यार्थ्यांची झाली सोय 
सोलापूर, दि. 09 - गावात उच्च शिक्षणाचा अभाव असल्याने पुढील शिक्षणासाठी शहराचा शोध घ्यायचा. महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर जायचे कसे हा प्रश्न. कारण गावात बसची सोय नाही, मग रोजचीच पायपीट.. असे किती दिवस हे सहन करायचे, गावात बस आलीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा ‘राधा’ या १२ वीत शिकणा-या तरुणीने घेतला आणि तिच्या त्या आक्रमकतेपुढे एसटी चालकाला नमते घ्यावे लागले. केवळ राधाच्या धाडसामुळे उपळवटे (ता़ माढा) येथे एस़ टी़ आली आहे. 
 
उपळवटे एक खेडेगाव़ केवळ आठवीपर्यंत शिक्षणाची सोय़ गावात सोयीसुविधांचा अभाव. त्यामुळे ग्रामस्थांना हरेक गोष्टीसाठी बाहेरगावी किंवा शहराच्या ठिकाणी जावे लागते. शिक्षण घेऊन इच्छिना-यांना तर अनेक संकटाचा सामना करावा लागतो, त्यात मुलींनी शिक्षण घेणे तर महाकठीच. आठवी झाल्यानंतर अनेकांना शिक्षणाची दारे बंद होतात. पुढील शिक्षण घ्यायचे म्हटले तर बाहेरचा रस्ता धरावा लागतो. सध्या गावातील ८० ते ९० विद्यार्थी रोज केम, टेंभुर्णी, इंदापूर, अकलूज, कुर्डूवाडी या ठिकाणी ये-जा करतात. उपळवटे हे गाव केम-टेंभुर्णी मार्गापासून दोन किमी आत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज दोन किमी चालत येऊन एस़टी किंवा मिळेल त्या वाहनाने जावे लागते. गावात एस़ टी़ सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी अनेकवेळा केली मात्र तात्पुरती सुरू होऊन बंद झाली. विद्यार्थ्यांचे हाल सुरूच होते.
शुक्रवारी नेहमीप्रमाणे उपळवटे येथील राधासह अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी केम-टेंभुर्णी एस़ टी़ मध्ये बसले होते. उपळवटे फाटा आल्यानंतर सर्व विद्यार्थी उतरु लागले, मात्र राधाने वाहक व चालकास एस़ टी़ उपळवटे येथे नेण्यास सांगितले अन्यथा मी बसमधून उतरणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. बस पुढे तशीच दहिवलीकडे मार्गस्त झाली, तोपर्यंत राधाने गावातील युवा नेते अतुल खुपसे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. अतुल खुपसे यांनी दहिवलीचे उपसरपंच अमोल पाटील यांना बस अडविण्यास सांगितले. तोपर्यंत अतुल खुपसे हे सहका-यांसह दहिवली येथे पोहोचले.
 
दहिवली येथे कुर्डूवाडी आगारप्रमुखास संपर्क साधून घडलेला प्रकार सांगण्यात आला़ तरीही चालकाने आज नको, उद्यापासून एस़ टी़ उपळवटेत घेऊन येतो असे सांगत होते. मात्र राधाने तिचा आग्रह सोडला नाही, अखेर परत सहा किमी अंतर एस़ टी़ उपळवटे येथे नेण्यात आली़ 
 
राधाच्या धाडसाचे कौतुक, जल्लोष
राधा मोहन जगताप हिने केलेल्या धाडसामुळेच उपळवटे येथे एस़ टी़ सुरू झाली़ त्यामुळे तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे़ शिवाय गावात एस़ टी़ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जल्लोष केला.