शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना अभय

By admin | Updated: April 2, 2015 03:05 IST

राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या

मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या समितीचा अहवाल राज्य सरकारने तत्त्वत: स्वीकारला आहे. या अहवालानुसार नागरी भागातील ७० ते ७५ टक्के अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भात महसूल विभागाचा अभिप्राय घेऊन येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई पुन्हा सुरू झालेली असली तरी कुंटे समितीने दिलेल्या अहवालानुसार ७० ते ७५ टक्के बांधकामे नियमानुकूल करणे शक्य असल्याने आता बांधकामे पाडणे हे नियमानुकूल होऊ शकणाऱ्या बांधकामांवर अन्याय करण्यासारखे होईल, अशी भूमिका शासनाकडून उच्च न्यायालयात तत्काळ मांडली जाईल आणि कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि अन्य सदस्यांनी पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत दिलीप वळसे-पाटील, बाबूराव पाचर्णे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, महेश लांडगे, गणपतराव देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे आदी सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. कुंटे समितीचा अहवाल हा राज्यातील सर्व नागरी भागांसंदर्भात आहे. सध्या अनधिकृत असलेली बांधकामे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधीन राहून अनधिकृत कशी करता येतील, याविषयी अहवालात शिफारशी करण्यात आल्या आहेत.तसेच यापुढे राज्यात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठीच्या उपाययोजनाही समितीने सुचविल्या आहेत. सर्व नागरी क्षेत्रातील अनियमित बांधकामांची वर्गवारी समितीने केली आहे. विकास नियंत्रण नियमावली निश्चित करण्यापूर्वी सामान्य नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत मते घेतली आहेत. महसूल विभागाचे मत घेण्यात येत आहे. कोणकोणती बांधकामे नियमानुकूल करता येतील, याचे सर्वेक्षण करण्यास राज्य शासनाला अवधी द्यावा, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ हजार ३२० अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)