मोठी बातमी! अरावलीने अडविली शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता मावळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:35 IST2026-01-21T09:35:12+5:302026-01-21T09:35:32+5:30

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv Sena SC Hearing: सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाची सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सरन्यायाधीशांच्या विशेष पीठामुळे या सुनावणीवर प्रश्नचिन्ह. वाचा सविस्तर बातमी.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv sena SC hearing big update: Big news! Aravalli blocks Shiv Sena party symbol hearing? Chances of hearing in Supreme Court today have faded | मोठी बातमी! अरावलीने अडविली शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता मावळली 

मोठी बातमी! अरावलीने अडविली शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता मावळली 

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांची — मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष — सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र, तांत्रिक आणि विशेष कामकाजामुळे ही सुनावणी पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मागील तारखेला या प्रकरणातील युक्तिवादाचे वेळापत्रकही ठरवून दिले होते. मात्र, आजच्या कामकाजात खालील अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे या प्रकरणाची बाजू मांडणारे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे. 

सरन्यायाधीश सूर्यकांत हे आज दुपारी १ वाजेपर्यंतच त्यांच्या नियमित न्यायालयाचे कामकाज पाहतील. त्यानंतर ते विशेष न्यायालयाच्या कामकाजात व्यस्त होणार आहेत. दुपारी १ वाजल्यापासून सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांचे विशेष पीठ 'अरावली डोंगर रांगा' संदर्भातील एका अत्यंत संवेदनशील प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. सरकारने १०० मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या भागालाच डोंगर मानण्याचा जो अहवाल दिला होता, तो पर्यावरण विरोधी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे, असे सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  

आज काय होऊ शकते?
जर सकाळी ११:३० ते दुपारी १ या दीड तासाच्या कालावधीत शिवसेना प्रकरणाला सुरुवात झाली, तरच उद्या ही सुनावणी पुढे सुरू राहू शकते. मात्र, कामकाजाची व्याप्ती पाहता, आज "शिवसेना सत्तासंघर्ष आणि धनुष्यबाण चिन्ह" या प्रकरणावर प्रत्यक्ष सुनावणी होईल, अशी आशा कमीच असल्याचे सरोदे यांचे मत आहे.

Web Title : शिवसेना प्रतीक चिन्ह सुनवाई में देरी: अरावली मामला सर्वोच्च न्यायालय में प्राथमिकता

Web Summary : शिवसेना पार्टी और प्रतीक चिन्ह विवाद पर सुप्रीम कोर्ट की सुनवाई में देरी। अरावली पर्वत श्रृंखला मामले को प्राथमिकता देने से आज की कार्यवाही पर अनिश्चितता है। कानूनी विशेषज्ञों के अनुसार, सीमित अदालत समय के कारण आज ठोस सुनवाई की संभावना कम है।

Web Title : Shiv Sena Symbol Hearing Delayed: Aravalli Case Takes Priority in Supreme Court

Web Summary : The Supreme Court hearing on the Shiv Sena party and symbol dispute faces delay. Prioritization of the Aravalli mountain range case casts uncertainty on today's proceedings. Limited court time reduces the likelihood of a substantial hearing today, according to legal experts.