शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वी परीक्षा घेतली, नियुक्ती अद्याप नाही

By admin | Updated: August 28, 2014 03:28 IST

राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने विविध ३३५ पदांसाठी सप्टेंबर २०१२ मध्ये लेखी परीक्षा घेऊन देखील अद्याप एकालाही नियुक्ती दिलेली नाही

मुंबई : राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने विविध ३३५ पदांसाठी सप्टेंबर २०१२ मध्ये लेखी परीक्षा घेऊन देखील अद्याप एकालाही नियुक्ती दिलेली नाही. या दिरंगाईविरुद्ध काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत राज्य शासनातर्फे देण्यात येणारी कारणे पटण्यासारखी नाहीत, असे स्पष्ट मत न्या. नरेश पाटील आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले.विशाल आनुसे आणि इतर उमेदवारांनी ही याचिका दाखल केली असून, पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. विशेष म्हणजे मंडळाने लेखी परीक्षा घेतली आणि नंतर मुलाखतींसाठी समितीदेखील स्थापन केली होती. तथापि, अलीकडे मंडळाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अशी भूमिका मांडली की, ज्या योजनेसाठी ही पदभरती करावयाची होती, ती अयशस्वी ठरली. त्या वेळी पदांसाठीची शैक्षणिक अर्हता योग्य नव्हती; स्टाफिंग पॅटर्नही बदलायचा आहे. त्यावर भरतीची प्रक्रिया सुरू करताना मंडळाला या बाबींची कल्पना नव्हती का, अशी विचारणा न्यायालयाने केली. अ‍ॅड. आशुतोष कुळकर्णी आणि अ‍ॅड. अक्षय शिंदे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. या भरतीच्या वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाने उमेदवारांकडून शुल्क आकारणी केली होती. या शुल्कापोटी ८ कोटी रुपये जमा झाले होते. राज्य शासनाला आता ही भरती प्रक्रियाच रद्द करावयाची असेल तर उमेदवारांना त्यांची रक्कम परत करावी आणि व्याजाची रक्कम दिरंगाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)