शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमचे दोन कोटी लुटले

By admin | Updated: January 17, 2015 06:04 IST

मिलन सब-वे परिसरात दिवसाढवळ्या बँकेची तब्बल २ कोटींची रोकड लुटण्यात आली. ही रोकड एटीएम मशीनमध्ये भरण्यात येणार होती

मुंबई : मिलन सब-वे परिसरात दिवसाढवळ्या बँकेची तब्बल २ कोटींची रोकड लुटण्यात आली. ही रोकड एटीएम मशीनमध्ये भरण्यात येणार होती. हे कंत्राट ज्या कंपनीकडे होते त्याच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या अन्य साथीदारांना हाताशी धरून हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.एटीएम मशिनमध्ये रोकड भरण्यासाठी एचडीएफसी बँकेने खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीने रोकड सुरक्षितपणे एटीएमपर्यंत पोहोचावी यासाठी ट्रान्स सिक्युरिटीशी करार केला होता. ट्रान्स कंपनीचे चार सुरक्षा रक्षक सकाळी लोअर परळ येथून बँकेचे २ कोटी १३ लाख रुपये घेऊन मीरारोड येथे निघाले. रोकड ज्या व्हॅनमध्ये होती ती ट्रान्स कंपनीची होती. या व्हॅनमध्ये शाबीर अली हा नवा सुरक्षा रक्षक होता. त्याने मिलन सब-वे परिसरात पोहोचताच व्हॅन थांबविण्याची विनंती चालकाला केली. मित्राकडून हजार रुपये घ्यायचे आहेत, अशी थाप त्याने मारली. काही वेळात तो चहा घेऊन व्हॅनमध्ये पोहोचला. तो चहा पिऊन व्हॅनमधील दोन सुरक्षा रक्षक बेशुद्ध पडले. हीच संधी साधून व्हॅनचा पाठलाग करणारी झेन कार पुढे आली. शाबीरनेच तीन साथीदारांच्या सहाय्याने व्हॅनमधील २ कोटींची रोकड घेऊन पळ काढला.