कुत्रा भुुंकल्याच्या वादातून दोघांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 01:57 IST2016-10-29T01:57:37+5:302016-10-29T01:57:37+5:30

पाळीव कुत्रा भुंकल्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना हुडकेश्वर येथे गुरुवारी रात्री घडली. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Two brothers attacked by dog ​​Bhunkal's dispute | कुत्रा भुुंकल्याच्या वादातून दोघांवर हल्ला

कुत्रा भुुंकल्याच्या वादातून दोघांवर हल्ला

नागपूर : पाळीव कुत्रा भुंकल्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना हुडकेश्वर येथे गुरुवारी रात्री घडली. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
हुडकेश्वरच्या बजरंगनगरात राहणारे पुंडलिक भांडेकर आणि त्यांचा मित्र उत्तम अखंड यांच्याकडे कुत्रा आहे. हा कुत्रा अयोध्यानगरातील मुन्ना परमार यांच्यावर काही दिवसांपूर्वी भुंकला होता. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला होता. गुरुवारी रात्री मुन्ना भांडेकर यांच्या घरासमोरून जात असताना कुत्रा पुन्हा गुरगुरला. त्यामुळे मुन्नाने शिवीगाळ केली. या वेळी भांडेकर आणि अखंड बाहेर आले. त्यांनी मुन्नाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुन्नाचा मुलगा चार - पाच साथीदारांसह आला आणि हॉकीस्टिक, लोखंडी सळईने उत्तम यांच्या डोक्यावर आणि पायावर घाव घातले. भांडेकर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत अखंड गंभीर जखमी झाले आहेत. भांडेकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two brothers attacked by dog ​​Bhunkal's dispute