शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील आदिवासी भागात फुलले रेशीम!

By admin | Updated: December 15, 2014 00:39 IST

उद्योगास प्रारंभ; अमरावतीला दिले शेतक-यांना प्रशिक्षण.

अकोला: वर्‍हाडातील आदिवासी भागातील शेतकरी पांरपरिक पिकांसोबतच नवे प्रयोग राबवित असून, आता या शेतकर्‍यांनी रेशीम शेती, उद्योगाची कास धरली आहे. रेशीम उद्योगाची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी या शेतकर्‍यांना प्रादेशिक रेशीम कार्यालयातर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ह्यरेशीम शेतीह्ण अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वर्‍हाडात चांगल्यापैकी जम बसविणार्‍या या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणार्‍या तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, आदिवासी भागात या पिकाची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून जवळपास २0 हजारांच्यावर अनुदान शेतकर्‍यांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने त्याच्या ५0 टक्के म्हणजे एक लाख रक्कम अनुदान दिली जाते.आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी रेशीम शेती करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याकरिता अमरावती प्रादेशिक रेशीम कार्यालयात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ातील प्रत्येकी पाच शेतकर्‍यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. पाचरण या आदिवासी भागातील शेतकरी राजाराम डाखोरे यांनी आदिवासी गावातील २५ शेतकर्‍यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त केले असून, रेशीम शेती उद्योगास सुरुवात करण्यात आली आहे. अकोला जिल्हय़ातील अंबाशी येथील शेतकरी सुखदेव लाहोळे यांनी दोन एकर क्षेत्रात एका वर्षात दोन लाख आणि रेशीमला लागणार्‍या तुतीच्या रोपापासून दोन असे चार लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. आदिवासी भागातील शेतकरी रेशीम शेतीसह रेशीम उद्योगाकडे वळत असून, रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेणारे शेतकरीही आदिवासी गावातील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे विभागात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत असल्याचे रेशीम विकास अधिकारी सु.प्र. फडके यांनी सांगीतले.