शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूककोंडी

By admin | Updated: July 4, 2016 01:34 IST

निकृष्ट कामामुळे रस्त्याला पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, चिखल, राडारोडा यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली

भोर : निकृष्ट कामामुळे रस्त्याला पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, चिखल, राडारोडा यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महामार्गावरील वाहतूक चुकीच्या (उलट्या) दिशेने येत असल्याने आज सकाळी १०च्या सुमारास तासभर वाहतूक ठप्प होती.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा भराव करून डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे २ दिवसांपासून पडणाऱ्या पहिल्याच पावसात डांबरीकरणाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पाणी साचून राडारोडा झाला आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटत असून, अपघात होत आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. पहिल्याच पावसात ही अवस्था झाली आहे. मोठा पाऊस झाल्यास वाहाळा बुजवल्याने व गटारे काढली नसल्याने सर्वच पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प होऊ शकते. आज सकाळी बोरमाळ खोपी येथील नवीन सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या मागे पावसामुळे व खेड शिवापूरजवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. महामार्गावर वाहतूक पोलीस नसल्याने टोलनाक्याजवळील पुणे बाजूकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पुणेकडे जाणाऱ्या लेनमध्ये घुसल्याने सुमारे एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे खेड शिवापूर ते शिवरे गावापर्यंत २ किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. पहिल्याच पावसात पुणे-सातारा महामार्गाची अवस्था गावाकडच्या एखाद्या पाणंद रस्त्यासारखी झाली आहे. पहिल्याच पावसात निकृष्ट कामामुळे डांबरीकरण उखडले. रस्ता खचला. मोठमोठे खड्डे, चिखलाचा राडारोडा, सूचना फलक नाहीत, यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.