टीकेचे रुपांतर प्रशंसेत होईल

By Admin | Updated: July 22, 2014 01:58 IST2014-07-22T01:58:59+5:302014-07-22T01:58:59+5:30

टीकेचे रुपांतर लवकरच प्रशंसेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे भाजपा पदाधिका:यांना दिला.

The transformation of the criticism will be in praise | टीकेचे रुपांतर प्रशंसेत होईल

टीकेचे रुपांतर प्रशंसेत होईल

मुंबई : केंद्र सरकार घेत असलेल्या काही निर्णयांमुळे सध्या टीका होत असली तरी आपले सरकार विकासाचेच राजकारण करणार असल्यामुळे या टीकेचे रुपांतर लवकरच प्रशंसेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे भाजपा पदाधिका:यांना दिला.
पंतप्रधान सोमवारी मुंबई भेटीवर आले होते.  डॉ. भाभा अणु संशोधन केंद्रास भेट दिल्यानंतर त्यांनी  एका पंचतारांकित हॉटेलात प्रदेश भाजपाच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. ते म्हणाले, युपीए सरकारच्या अत्यंत असमाधानकारक राजवटीच्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे सत्ता आली आहे. अशावेळी काही कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यावर होत असलेल्या टीकेकडे लक्ष्य न देता विकासाचे राजकारण करण्यावर भर द्या. मतदारांच्या मनात आजही आपल्या बद्दल विश्वास आहे. यापुढे आम्ही घेणार असलेल्या निर्णयांमुळे तो निश्चितच वाढणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पदाधिका:यांच्या भावना जाणून घेतल्या. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुढी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मोदी यांना यावेळी सिध्दीविनायकाची प्रतिमा भेट देण्यात आली. हॉटेलमध्ये येताच मोदी यांनी एसपीजी सुरक्षेला बाहेरच थांबायला सांगितले आणि ते बैठकीत सहभागी झाले. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: The transformation of the criticism will be in praise