शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो घोटाळा शोधणाऱ्या अभियंत्याची बदली

By admin | Updated: June 29, 2014 00:36 IST

जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील दहा कोटी रुपयांच्या रोजगार हमी योजना घोटाळ्याची पाळेमुळे खणणाऱ्या अभियंत्याची झरीजामनी येथून पुसद उपविभागांतर्गत दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागात

१० कोटींचा घोटाळा : झरीजामनीतून पाठविले दिग्रसला यवतमाळ : जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील दहा कोटी रुपयांच्या रोजगार हमी योजना घोटाळ्याची पाळेमुळे खणणाऱ्या अभियंत्याची झरीजामनी येथून पुसद उपविभागांतर्गत दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामागे राजकीय चक्रे फिरली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गुलाबराव भोळे असे या अभियंत्याचे नाव आहे. ते जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्थ रोहयो विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनीच या घोटाळ्याबाबत पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून तत्कालिन तहसीलदार आणि तीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. हा घोटाळा खणून काढण्यात भोळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची संपूर्ण कागदपत्रे तयार करणे, त्याचा पाठपुरावा करणे, प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा, पाहणी अहवाल तयार करणे ही सर्व कामे भोळे यांनी केली. मात्र गुन्हा दाखल होताच भोळे यांची अचानक उचलबांगडी करण्यात आली. या बदलीमागे विनंती आहे की प्रशासकीय कारण, हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. भोळे यांची बदली राजकीय सूडातून तर झाली नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील या घोटाळ्याची तक्रार ४ फेब्रुवारी २०१२ रोजी सर्वप्रथम जनसेवक सेवा समितीचे अध्यक्ष रजनिकांत बोरेले यांनी केली होती. दोषींवर गुन्हे दाखल करावे, दोषींकडून रक्कम वसूल करावी अशी मागणी करणारी याचिका बोरेले यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केली होती. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील मुख्य तांत्रिक अधिकारी गुलाबराव भोळे यांच्या बदलीमागील नेमके कारण काय, याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पाटण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने या घोटाळ्यातील कंत्राटदार, वन अधिकारी, कर्मचारी, डाक खात्याची यंत्रणा आदींमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. तपासादरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून धरपकड होण्याच्या भीतीने या घोटाळ्याशी संबंधित अनेकजण भूमिगत झाल्याचे समजते. (जिल्हा प्रतिनिधी)