शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा

By admin | Updated: May 31, 2014 22:21 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले.

मंचर : आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या (१ जून) सकाळी १० वाजता शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी सत्कार समारंभ व विजयी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले. मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा तालुका शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. विजयी मेळावादेखील यावेळी होणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख राम गावडे, कल्पनाताई आढळराव पाटील, उपजिल्हाप्रमुख विजयराव पवार, बैलगाडा विमा कंपनीचे अध्यक्ष जयसिंग एरंडे, शिवसेना ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले, लक्ष्मणराव काचोळे, महिला आघाडी तालुका संघटक स्वाती घुले, जि.प. सदस्या अलका घोडेकर, पं.स. सदस्य मनोहर भालेराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या वेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व तमाम शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले यांनी केले आहे.