आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी - पंकजा मुंडे

By Admin | Updated: March 9, 2015 06:01 IST2015-03-09T06:01:37+5:302015-03-09T06:01:37+5:30

आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यामुळे या नक्कीच सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेतील, असे गौरवोद्गार महिला व

Today's female Levi - Pankaja Munde of Savitri | आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी - पंकजा मुंडे

आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी - पंकजा मुंडे

मुंबई : आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यामुळे या नक्कीच सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेतील, असे गौरवोद्गार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी काढले. ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत, महिलांमध्ये जन्मत: उद्योजकतेचे बीज रुजलेले असते, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. उद्योग क्षेत्रातील महिलांनी उत्पादनातील उत्तम दर्जाला प्राधान्य द्यावे. शिवाय, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर उद्योगांसाठी करावा, असा सल्ला सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Today's female Levi - Pankaja Munde of Savitri