शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरात महाद्वार प्रवेशाची कोंडी फुटेना!

By admin | Updated: September 13, 2016 05:39 IST

नवरात्रोत्सव काळात भाविकांसह इतरांना महाद्वारमार्गे प्रवेश न मिळाल्यास गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे

उस्मानाबाद : नवरात्रोत्सव काळात भाविकांसह इतरांना महाद्वारमार्गे प्रवेश न मिळाल्यास गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या बैठका सुरू असून यातून समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांचा ओघ असतो. नवरात्रोत्सवात ही संख्या अनेक पटींनी वाढते. २०१३च्या नवरात्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील वर्षी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भाविकांना महाद्वारऐवजी घाटशीळमार्गे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.याची अंमलबजावणी यंदाही करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र याला तुळजापुरातील व्यापारी, पुजाऱ्यांसह नागरिकांचा विरोध आहे. घाटशीळमार्गे प्रवेश दिल्याने भाविकांच्या अडचणी वाढतात. तसेच यात्रेवरही परिणाम झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवापासून पुन्हा महाद्वारमार्गेच प्रवेश देण्याची मागणी तुळजापूरकरांनी लावून धरली आहे. आज मुंबईत बैठकआंदोलकांच्या विनंतीवरून सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजापूर मंदिर परिसराची पाहणी केली. या प्रश्नी आताच काही बोलणार नाही; मात्र या विषयासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनासह पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बैठकीसाठी पाचारण केल्याचे देशमुख यांनी सांगितले.