शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम आग प्रकरणी तिघांना कोठडी

By admin | Updated: December 29, 2014 05:22 IST

तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला

भिवंडी : तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्या तिघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जागेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.रहानाळ येथील मढवी कम्पाउंडचे मालक राजन मढवी यांनी भंगार साठवणूक करण्यासाठी मनवर अली जंगबहादूर खान, इश्तियाक अहमद उस्मान अली सलीम अन्सारी व शौकत अली उस्मान अन्सारी या तिघांना दोन हजार रुपये भाड्याने जागा दिली होती. त्यामध्ये लाकडाच्या फ्रेम्स, प्लास्टिक व इतर वस्तू साठविलेल्या होत्या. रात्री २.३० वाजता लागलेल्या आगीत तीन गोदामांसह भंगार भरलेले तीन टेम्पो जळून खाक झाले. ही आग शेकोटी, शॉर्टसर्किट अथवा अग्निजन्य पदार्थामुळे भडकली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काल फोरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळाला भेट देऊन आगीची कारणे शोधण्यासाठी काही वस्तू तपासासाठी घेऊन गेले आहेत. या गोदामांना ग्रामपंचायतीची परवानगी नव्हती तसेच वापरण्यात येणारे वीज कनेक्शन अवैध होते, असे परिसरातील गोदामातील सूत्रांनी सांगितले. या गोदामांत नवीन उत्पादनाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडाच्या फ्रेम बनविण्यात येत होत्या. ते लाकूड हलक्या दर्जाचे असल्याने साठविलेल्या लाकडाने व त्या शेजारी साठविलेल्या प्लास्टिक भंगार वस्तूंनी पेट घेतला. अशा ज्वलनशील वस्तूंचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या गोदामात अथवा परिसरात केली नसल्याने आठ कामगारांचा नाहक बळी गेला. ३२लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. नारपोली पोलीस ठाण्यात या आग प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन गोदामचालकांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)