तीन लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पकडले !

By Admin | Updated: June 22, 2015 04:15 IST2015-06-22T02:31:26+5:302015-06-22T04:15:04+5:30

वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एक हजार व पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या खबरदारीमुळे

Three lakh fake currency notes fetched a racket! | तीन लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पकडले !

तीन लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पकडले !

नाशिक : वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एक हजार व पाचशेच्या बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट मंदिर प्रशासन व गावकऱ्यांच्या खबरदारीमुळे उघड झाले. नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबातील लहान मुले व महिलांसह १४ संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख पंचवीस हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत.
रविवारी सकाळी टाटा-४०७, दोन मॅक्स-जीप, एक बोलेरो व स्कार्पिओ या वाहनांमधून जामखेड (जि. अहमदनगर), बीड, सोलापूर जिल्ह्यातील काही कुटुंबे सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी आले होते. संबंधित महिला गडावरील दुकानातुन पूजेचे साहित्य, प्रसाद, खाद्य पदार्थ, मुलांची खेळणी खरेदी करीत होते. एक हजाराची नोट देऊन हे संशयित केवळ पन्नास ते शंभर रूपयांचीच खरेदी करत होते. मिळालेले सुटे पैसे बाजूला ठेवून, पुन्हा हजाराची नोट देत वस्तू खरेदी करण्याचा त्यांचा सपाटा सुरूच होता.
मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पिंटू बत्तासे यांना हजाराची नोट देऊन त्यांच्या दुकानातून काहींनी खरेदी केली. बत्तासे यांना संशय आल्याने त्यांनी मंदिर विश्वस्तांच्या देणगी कार्यालयातील मशिनमध्ये हजाराची नोट तपासली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, संदीप बेनके-पाटील यांनी परिसरातील दुकानदार व गावकऱ्यांना सावध करत संशयितांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. (वार्ताहर)

Web Title: Three lakh fake currency notes fetched a racket!