शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकजवळ अपघातात तिघे ठार

By admin | Updated: May 13, 2015 01:28 IST

नाशिक-पुणे महामार्गावर निमआराम हिरकणी बस व रसायनांचे ड्रम घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोत समोरासमोर धडक होऊन बसचालकासह

सिन्नर (नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावर निमआराम हिरकणी बस व रसायनांचे ड्रम घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोत समोरासमोर धडक होऊन बसचालकासह तिघे ठार तर १३ जण जखमी झाले. अपघातानंतर रसायनांच्या ड्रमने पेट घेतल्याने संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सिन्नरजवळील लिंगटांगवाडी शिवारात मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात बसचालक दत्तात्रय मल्हारी मदने (४५, रा. वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे) सातारा येथील स्थानिक साप्ताहिकाचे पत्रकार मानवेंद्र शिवाजी जाधव (४५) व वैशाली वसंत पवार (३२, कोरेगाव, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला.मिरज आगाराची मिरज-नाशिक निमआराम बस सोमवारी रात्री मिरजहून नाशिककडे येत असताना सिन्नरजवळ टेम्पोच्या लोखंडी अँगलने बसच्या चालकाची पाठीमागील बाजू अक्षरश: कापत नेली. त्यात बसचालक व पाठीमागील दोन बाकांवरील प्रवाशांना गंभीर मार लागला. बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळली. टेम्पोमधील रसायने पेटल्यानंतर चालक अकील मोमीन शेख व क्लीनर पंडित इंद्रभान गांगुर्डे यांनी उड्या मारत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांचे हात भाजल्याने ते जखमी झाले. त्यानंतर काही क्षणांतच रसायनांचा स्फोट होऊन टेम्पो जळून खाक झाला. रसायनांच्या ड्रमचे स्फोट झाल्यानंतर जवळच्या शेतात काढलेला उन्हाळ कांदाही जळाला. (वार्ताहर)