सासरी मतदान करण्यासाठी महिलांना 'हे' १४ पुरावे महत्वाचे; तरच करता येईल मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:15 IST2026-04-01T20:13:26+5:302026-04-01T20:15:20+5:30

Bhandara : २०२४ च्या मतदार यादीचे २००२ सी मॅपिंग सुरू आहे. जागृत सुनांनी मतदान हक्क कायम ठेवण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्टा सुरू केली आहे. मतदान करण्याचा तुमचा हक्क आहे, पण जर तुमच्याकडे २००२ चे पुरावे नसतील तर हा हक्क कायमचा हिरावला जाण्याची शक्यता आहे.

These 14 pieces of evidence are important for women to vote in their in-laws' elections; only then can they vote | सासरी मतदान करण्यासाठी महिलांना 'हे' १४ पुरावे महत्वाचे; तरच करता येईल मतदान

These 14 pieces of evidence are important for women to vote in their in-laws' elections; only then can they vote

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर:
२००२ नंतरच्या लग्न झालेल्या सुनांना सासरी मतदान करण्यासाठी निवडणूक विभागाच्या आदेशाने काही पुरावे गरजेचे असल्याचे कळवले आहे. यात सुनेच्या आई-वडिलांचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे स्वतःचे पूर्ण नाव गाव, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक व २००२ च्या यादीतील अनुक्रमांक ठरविण्यात आला आहे.

२०२४ च्या मतदार यादीचे २००२ सी मॅपिंग सुरू आहे. जागृत सुनांनी मतदान हक्क कायम ठेवण्याकरिता प्रयत्नाची पराकाष्टा सुरू केली आहे. मतदान करण्याचा तुमचा हक्क आहे, पण जर तुमच्याकडे २००२ चे पुरावे नसतील तर हा हक्क कायमचा हिरावला जाण्याची शक्यता आहे.

कारण निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमानुसार आता २०२४ च्या मतदार यादीतील नावांचे २००२ च्या यादीशी मॅपिंग केले जात आहे.

यात ज्यांचे नाव २००२च्या यादीत सापडणार नाही किंवा जे आवश्यक पुरावे देऊ शकणार नाही, त्यांचे नाव मतदार यादीतून कमी केले जाणार आहे. या नव्या प्रक्रियेमुळे विशेषता लग्न होऊन आलेल्या सुनांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे सुनेला आपले नाव मतदार यादीत टिकविण्यासाठी माहेरच्या आई-वडील किंवा आजी आजोबांच्या २००२ च्या नोंदी सक्तीने शोधाव्या लागणार आहेत. त्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढणार आहे. 

मतदार यादीत नाव नसल्यास हे १४ पुरावे गोळा करून ठेवा

२००२ पूर्वीची मतदार यादी किंवा जुने निवडणूक पावती, जमीन / मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडेकरू असल्याच्या नोंदी, नागरिकत्व प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे, शासनाने दिलेला कोणताही अधिकृत परवाना / प्रमाणपत्र, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र/दस्तऐवज, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे खाते /पासबुक, जन्म प्रमाणपत्र, बोर्ड किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, न्यायालयाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे. रेशन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र 

क्यूआरकोड उपलब्ध

२००२ ची मतदार यादी शोधण्याकरिता प्रशासनाने क्यूआरकोड उपलब्ध करून दिला आहे. तसेच ECINET या मोबाइल अॅप याद्वारे २००२ ते २०२४ मधील मतदारांची नावे, आपल्या परिसरातील बीएलओचे नाव व मोबाइल क्रमांक शोधता येणार आहे हे विशेष!

"एसआयआर अंतर्गत सर्व मतदारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जवळच्या बीएलओकडे आवश्यक कागदपत्र घेऊन मतदार नोंदणी निश्चित करा."
- शीतल घावटे, तहसीलदार, लाखनी

Web Title : विवाहित महिलाओं को ससुराल में वोट देने के लिए महत्वपूर्ण दस्तावेज़।

Web Summary : 2002 के बाद विवाहित महिलाओं को ससुराल में वोट देने के लिए विशिष्ट दस्तावेज़ चाहिए। 2002 के डेटा के साथ मतदाता सूची मैपिंग में प्रमाण की कमी होने पर नाम हटाने का जोखिम है। पुरानी मतदाता सूची, संपत्ति के कागजात, जन्म प्रमाण पत्र सहित चौदह दस्तावेज़ स्वीकार किए जाते हैं। क्यूआर कोड सूची खोज में सहायता करते हैं।

Web Title : Crucial documents for married women to vote in husband's home.

Web Summary : Women married after 2002 need specific documents to vote at their husband's. Voter list mapping with 2002 data risks name removal if proof lacks. Fourteen documents, including old voter lists, property papers, and birth certificates, are accepted. QR codes aid list searches.