शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नाही

By admin | Updated: September 9, 2014 05:11 IST

मुस्लीम समूदायाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणार्‍या हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नियुक्त केला गेला नाही.

यवतमाळ : मुस्लीम समूदायाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणार्‍या हज कमिटीवर विदर्भातून एकही सदस्य नियुक्त केला गेला नाही. त्यामुळे विदर्भातील २६ लाख मुस्लीम मतदारांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या दिग्रस-दारव्हा या परंपरागत मतदारसंघातूनच बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी केली जात आहे. दारव्हा नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष तथा माणिकरावांचे निकटवर्तीय मानले जाणार्‍या सय्यद फारुक यांनी 'लोकमत'कडे मुस्लीम समाज बांधवांची काँग्रेस नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली. सय्यद फारुक म्हणाले, १५ सदस्यीय हज कमिटीवर दर तीन वर्षांनी नवे सदस्य नियुक्त केले जातात. गेली चार वर्ष या समितीकडे लक्षच दिले गेले नाही. यावेळी या समितीची पुनर्रचना केली गेली. मात्र काँग्रेसने आपल्या कोट्यातून विदर्भातून एकही सदस्य या कमिटीवर नियुक्त केला नाही. मराठवाड्यातही केवळ एक सदस्य समितीवर घेतला गेला. बहुतांश सदस्य काँग्रेसने मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्रातील घेतले आहे. विदर्भात २६ लाख मुस्लीम मतदार असताना एकही प्रतिनिधित्व काँग्रेसकडून हज कमिटीवर दिले जाऊ नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीतसुद्धा वैदर्भीय मुस्लीम बांधवांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. या प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नाराजी बाबतची निवेदने दिली गेली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना भेटलो असता 'मुख्यमंत्री माझे ऐकत नाहीत' असे म्हणून त्यांनी हातवर केल्याचे सय्यद फारुक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)