शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वेल्डिंग फ्रॅक्चरमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट?

By admin | Updated: May 23, 2014 04:23 IST

नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबई : नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र लोको पायलटने रेल्वे सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या जबाबात हा अपघात वेल्डिंग फ्रॅक्चरमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. ४ मे रोेजी नागोठणे ते रोह्यादरम्यान भिसे खिंडीजवळ या ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या भागात ५ अंशाचा वक्र असून, तेथे ५५ची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने डबे पलटी झाले ते पाहता अतिवेगामुळेच अपघात झाल्याची चर्चा होत होती. त्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही तपास सुरू होता. मात्र अपघाताची चौकशी करताना लोको पायलटचा जबाब रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नोंदवण्यात आला असून, यात अतिवेगामुळे अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागात अपघात घडला त्या ठिकाणी ट्रेन आली असता एक मोठा आवाज झाला आणि ट्रेनचे डबे पलटी झाल्याचे सांगितले; तसेच वेगही नियंत्रित असल्याचे जबाबात म्हटले. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले, आमच्याकडून अपघातग्रस्त गाडीच्या वेगाचीही तपासणी करण्यात आली असता नियमाप्रमाणे त्या भागात गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिवेगामुळे हा अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ३०पेक्षा जास्त साक्षीदारांचा जबाब घेतला असून, यामध्ये रेल्वेचे कर्मचारी, प्रवासी आणि पोलिसांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)