शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

...तर आयपीसी ३०६ लावू नका

By admin | Updated: December 30, 2015 01:17 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून

मुंबई : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून सुटका करताना उच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला. ही नोंद न केल्यास आयपीसी ३०६ हे कलम लावू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.महावितरणमध्ये सहायक अभियंते म्हणून काम करत असलेले किशोर शिंदे यांच्यावर कनिष्ठ तंत्रज्ञ दिलीप मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २० मार्च २०१४ रोजी दिलीप मगर आणि एस.बी. भामगर हे महावितरणाचे तंत्रज्ञ हडपसर येथील एक वायर नीट करण्यासाठी गेले. त्यासाठी भामगर इलेक्ट्रिक पोलवर चढले तेव्हा त्यांना विजेचा शॉक बसला. ४ एप्रिल रोजी भामगर यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे मगर यांना नैराश्य आले आणि या नैराश्यातूनच त्यांनी ८ एप्रिल २०१४ रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भामगर यांच्या मृत्यूमुळे ते खूप अस्वस्थ झाल्याचे लिहिले होते. तसेच शिंदे आणि आणखी दोन वरिष्ठ सारखे छळवणूक करत असल्याचा आरोपही मगर यांनी सुसाईड नोटद्वारे केला होता. त्यांच्या सुसाईड नोटची दखल घेत पोलिसांनी शिंदे आणि अन्य दोघांवर मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. हा खटला रद्द करण्यात यावा, यासाठी शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.‘भारतीय दंडसंहिता कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गतगुन्हा नोंदवायचा असल्यास आरोपीने पीडिताला आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप नोंदवणे आवश्यक आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याने काहीतरी मदत करणे किंवा काहीतरी बेकायदेशीर कृत्य केलेले असणे आवश्यक आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.‘आरोपीमुळेच पीडित व्यक्तीने आत्महत्या केली, हे सिद्ध करणे आवश्यक आहे. पीडित व्यक्तीने आत्महत्या करणे, हाच आरोपीचा हेतू असणे आणि त्यादृष्टीने त्याने बेकायदेशीर कृत्य करणे, हे सिद्ध होणेही आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.या केसमध्ये मगरला त्याचा सहकारी मृत्यू पावल्याचा मानसिक धक्का बसला होता. शिंदेने त्यांना आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. (प्रतिनिधी)