सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या विवाहाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला मुंबईत उडणार लग्नाचा बार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:56 IST2026-03-21T14:55:23+5:302026-03-21T14:56:33+5:30

Revati Sule Wedding: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी याच्याशी निश्चित झाला आहे. रेवती आणि सारंग यांचं लग्न ठरल्याची बातमी गेल्या महिन्यात समोर आली होती. त्यानंतर आता या दोघांच्या विवाहाची तारीख आणि लग्नसोहळा कुठे पार पडणार आहे याची माहितीही समोर आली आहे.

The wedding date of Supriya Sule's daughter Revati Sule has been set, the wedding bar will be opened in Mumbai on 'this' date | सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या विवाहाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला मुंबईत उडणार लग्नाचा बार

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या विवाहाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला मुंबईत उडणार लग्नाचा बार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी याच्याशी निश्चित झाला आहे. रेवती आणि सारंग यांचं लग्न ठरल्याची बातमी गेल्या महिन्यात समोर आली होती. त्यानंतर आता या दोघांच्या विवाहाची तारीख आणि लग्नसोहळा कुठे पार पडणार आहे याची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळा २० जून २०२६ रोजी मुंबईत होणार आहे.

सुळे आणि लखानी कुटुंबीयांकडून या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मुंबईमध्ये हा विवाह सोहळा २० जून रोजी संपन्न होणार असून, लग्नाचा मुख्य कार्यक्रम हा मोजक्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित पार पडणार आहे. तर नंतर स्वागत समारंभ हा भव्य दिव्य प्रमाणात आयोजित केला जाणार आहे. त्यातही लखानी कुटुंबीय हे नागपूरचे असल्याने लग्नानंतर नागपूरमध्येही स्वागत समारंभाचं आयोजन होणार आहे. याशिवाय सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या दिल्लीतील राजकारणात असलेल्या स्नेहसंबंधांमुळे एक रिसेप्शन सोहळा राजधानी दिल्लीमध्येही आयोजित होण्याची शक्यता आहे.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं लग्न ठरवून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी सुळे आणि लखानी कुटुंबीयांमध्ये सोयरिक जुळवली होती. तसेच सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं लग्न गडकरी आणि फडणवीस यांनी ठरवल्याने या सोयरिकीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली होती. 

Web Title: The wedding date of Supriya Sule's daughter Revati Sule has been set, the wedding bar will be opened in Mumbai on 'this' date