शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यापाऱ्यांचा जीएसटीविरोध सुरूच

By admin | Updated: June 30, 2017 02:03 IST

कापडावर लावण्यात आलेल्या ५ टक्के जीएसटीच्या निषेधार्थ देशभरातील कापड व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी कापड बाजार व दुकाने बंद होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कापडावर लावण्यात आलेल्या ५ टक्के जीएसटीच्या निषेधार्थ देशभरातील कापड व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी कापड बाजार व दुकाने बंद होती. काही ठिकाणी तीन दिवसांपासून तर काही शहरांत गेले दोन दिवस कापड बाजार बंद आहेत. आतापर्यंत कापड उद्योगावर कोणताही कर नव्हता. त्यामुळे जीएसटीही लावू नये, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. मुंबई, दिल्ली, कानपूर, सुरत, अहमदाबाद, जयपूर, लुधियाना, कोईम्बतूर, सेलम, तिरुपूर, मालेगाव आणि भिवंडी आदी शहरांतील घाऊक कापड बाजार त्यामुळे बंद आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनीही काही तास वा दिवसभर दुकाने बंद ठेवली. कापडावर लावण्यात आलेला जीएसटी मागे घेण्यात यावा, अशी मागणी कापड उद्योगातर्फे करण्यात आली आहे. राजस्थानातील कापड व्यापारी ३0 ते ३ जुलैपर्यंत बंद पाळणार आहेत. तिथे कापडाच्या २४७ मोठ्या बाजारपेठा असून, त्यातून रोज सुमारे १२00 कोटी रुपयांचे व्यवहार होतात. मुंबईतील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळजी जेटा मार्केट, मंगळदास मार्केट, हिंदमाता मार्केट व गांधी मार्केटमध्येही शुकशुकाट आहे. तामिळनाडूमधील फेडरेशननेही बंद जाहीर केला असून, त्यामुळे तिरुपूर, सेलम, कोईम्बतूर, करूरमधील दीड लाखांहून अधिक पॉवरलूमधारक त्यात सहभागी झाले आहेत. कापड उद्योगावर आतापर्यंत करआकारणी नव्हती. आता जीएसटी लागू का करता, असा त्यांचा सवाल आहे.आज निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन-शुक्रवारी जीएसटी कौन्सिलची बैठक असून, त्यात कापड उद्योगावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, अन्यथा आमचे आंदोलन सुरूच राहील, असे गुजरातमधील कापड व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असताना तेथील कापड बाजार मात्र बंद होते.