शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरते शेड्स न काढणाऱ्यांना परवानगी नाही

By admin | Updated: June 8, 2017 02:28 IST

गेल्या वर्षी पावसाळ्याच्या काळात उभारलेले तात्पुरते शेड्स ज्यांनी हमी देऊनही ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत काढून टाकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षी पावसाळ्याच्या काळात उभारलेले तात्पुरते शेड्स ज्यांनी हमी देऊनही ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत काढून टाकले नाही, त्यांना या वर्षी तात्पुरते शेड उभारणीसाठी परवानगी देऊ नये, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला आयुक्त अजय मेहता यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.दरवर्षी पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक हॉटेल्स, दुकाने, कार्यालये, घरे अशा विविध आस्थापना तात्पुरत्या शेड्स उभ्या करत असतात. त्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयांकडून रीतसर परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना संबंधितांनी हे शेड्स पावसाळा संपल्यानंतर ३१ आॅक्टोबरपर्यंत काढून टाकणे बंधनकारक असते. तरीही काही ठिकाणी या शेड्स तशाच उभ्या असतात. याची गंभीर नोंद घेऊन ३१ आॅक्टोबर २०१६पर्यंत या तात्पुरत्या पावसाळी शेड्स काढून न टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच या वर्षापासून त्यांना तात्पुरत्या शेड्ससाठी परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.विभाग कार्यालयातील संबंधित साहाय्यक अभियंत्यांना यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यात ज्यांना परवानग्या देण्यात आल्या त्यांची नावे आणि इतर तपशील याची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विभागीय कार्यालयाच्या इमारत व कारखाने खात्यातील संबंधित ‘बीट अधिकारी’ यांनी त्यांच्या भागातील तात्पुरत्या पावसाळी शेड्ससाठी परवानगी दिलेल्या आस्थापनांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत शेड्स काढली आहेत किंवा नाहीत याची पाहणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.ज्या आस्थापनांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत शेड्स काढली नसतील त्यांची नावे नोंदवहीमध्ये नोंदविण्यात यावीत. ज्याआधारे पुढील वर्षी या आस्थापनांना परवानगी नाकारता येऊ शकेल; शिवाय संबंधित विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पावसाळा संपल्यानंतर हे तात्पुरते शेड्स काढले जातात किंवा नाही याचा आढावा घेऊन नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.