शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्या गाव-घराजवळ!

By admin | Updated: October 12, 2015 05:27 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर/औरंगाबाद : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारेच शिक्षकांच्या गावाजवळ नियमित आणि आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.‘लोकमत’ने चार दिवसांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षक सध्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे कुटुंब दूर असल्याने त्यांचा संसार विस्कटण्याच्या मार्गावर आहे. त्याबाबत ‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल अखेर राज्य शासनाला घ्यावी लागली. अहमदनगरमध्ये शिक्षकांच्या मेळाव्यात शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ‘मदत’ प्राणलीचा ओझरता उल्लेख केला. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी भापकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी ‘मदत’विषयी माहिती दिली. समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे त्यांना कमीत कमी त्रास व्हावा, हाच आमचा उद्देश आहे. शिक्षकांचे कौटुंबिक स्वास्थ्य राखले जाईल. त्यांना त्यांचे गाव-घराजवळ आणण्यासाठीच ही प्रणाली आहे. प्रत्यक्ष काम कसे होईल, यासंदर्भात दोन दिवसांत सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना त्याच दिवशी पेन्शन मंजुरीचे कागदपत्रे आणि चेक मिळतील. जानेवारी महिन्यापासून राज्यात महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांचे पगार करण्यात येणार असून जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शिक्षकांची प्रशिक्षणे बंद करण्यात आली असून मागणीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरील बैठकांना आता ब्रेक लावून व्हिडीओ कॉन्फरन्सवर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)