शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीपदावरून रणकंदन

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

राजकीय खळबळ : भाजपच्या वाट्याला यावेळीही वाटाणे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रामदास कदम यांना मिळेल, या आशेवर असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या निराशेनंतर हे पद भाजपलाही मिळाले नसल्याने आता त्यांनीही या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत.रत्नागिरीच्या वाट्याला युतीचे सरकार यापूर्वी एकदाच आले. त्या काळात रवींद्र माने, रामदास कदम हे दोघेही पालकमंत्री बनले. त्यानंतर प्रथमच राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगत असतानाच जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर यांची निवड झाली. या निवडीनंतर शिवसेना व भाजपचे पालकमंत्री न झाल्याबद्दल भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीची फैर प्रदेश पातळीपर्यंत पोहोचली असून, नजीकच्या काळात या निर्णयाचा फेरविचार झाल्यास पालकमंत्रीपद बदलले जाईल काय, असा प्रश्नही विचारला जात आहे.कोकणात यापूर्वी रत्नागिरीच्या वाट्याला परजिल्ह्यातील बहुतांश पालकमंत्री आले. हसन मुश्रीफ, दिग्विजय खानविलकर, अजित घोरपडे, बबनराव पाचपुते व सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली होती. त्यातल्या त्यात जुन्या काळात ल. रं. हातणकर यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. याआधीच्या आघाडी सरकारमध्ये भास्कर जाधव व उदय सामंत यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. कित्येक वर्षांनंतर राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर रामदास कदम यांना हे पद मिळेल, असे वाटत असताना त्यांना जिल्ह्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या विनोद तावडेंकडे जिल्हा सोपविला जाईल, अशी अटकळ बांधली जात असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद शिवसेनेने आपल्याकडेच ठेवले.रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यात भाजपला केवळ रायगडमध्ये यश मिळाले. जिल्ह्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गात शिवसेनेचेच अधिक आमदार आल्याने पालकमंत्री त्याच पक्षाचा होणार हे गृहीत असले तरी भाजपच्या कोकणातील वाढीसाठी रत्नागिरीकडे विनोद तावडे यांच्या रुपाने पालकमंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता असतानाच वायकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने पालकमंत्री पदाबाबत शिवसेना रामदास कदम यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने तर भाजप तावडे यांना हे पद न मिळाल्याने नाराज आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदानंतर उसळलेली ही नाराजी नजीकच्या काळात संपविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.शिवसेनेकडून आमदार झालेल्या जिल्ह्यातील तीनही उमेदवारांना मंत्रीपदाची इच्छा होती. त्यामुळे जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री मिळल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेना-भाजप दोन्ही बाजूचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. (प्रतिनिधी)भाजप अद्यापही आशावादी...जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आजपर्यंत भाजपची पाटी कोरीच राहिली आहे. राज्यात ज्या ज्यावेळी काँग्रेसविरोधी सरकार आले त्यावेळी जिल्ह्याबाहेरच्या व भाजपव्यतिरिक्त हे पद देण्यात आले. हीच परंपरा यावेळीही राखली गेली. आता ही पदे घोषित झाली असली तरी कालांतराने कोकणात मंत्रिमंडळ विस्तारात कदाचित भाजपला स्थान मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात जिल्ह्याला भाजपचा पालकमंत्री असण्याची आशा असल्याचे काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.रत्नागिरीवर रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून यापूर्वी नेमण्यात आले. आता मुंबईतील व्यक्तीला हे पद देण्यात आले आहे. भाजप संघटना वाढीसाठी व शिवसेनाही आपल्या राजकीय विरोधकांना आव्हान देण्यासाठी आपापल्या नेत्याची वर्णी या पदासाठी लावण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, तो प्रयत्न आजच्या घडीला संपल्यात जमा आहे. परजिल्ह्यातील मंत्री असण्याची जिल्ह्यातील परंपरा सुरू असली तरी वायकर कोकणातील असल्याने त्यांना शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचे बोलले जाते.